अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात धनंजय मुंडेंचा हल्लाबोल; धनुभाऊंनी संदीप क्षीरसागरांना पकडलं कोंडीत!
Beed Crime: त्या पीडित मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आपला सुद्धा आहे, असा पवित्रा आता धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

Beed Crime: बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपलं मौन सोडलं आहे. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय. या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष दिसून येतोय. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट... (Beed Sexual Harassment case)
संदीप क्षीरसागर जिथे राहतात त्याचा मालक कोण आहे? याची शोधपत्रकारिता करावी. शिवाय जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, त्या मुलीच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण आत्महत्या करावी. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सगळं सांगितलं. तर पोलीस म्हणतात आम्ही व्यवस्थित तपास करू. पोस्को केसमध्ये दोन दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला सुनावण्यात आली आहे. मात्र त्या पीडित मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आपला सुद्धा आहे, असा पवित्रा आता धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
आरोपींचे सीडीआर तपासा, धनंजय मुंडेंची मागणी
बीडमधील एका खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये "नीट" ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोन शिक्षकांनीच लैंगिक छळ केला.. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोन्ही शिक्षक अटकेत आहे.. यातील विजय पवार हा शिक्षक विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड असल्याचा आरोप केला जातोय.. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची कोंडी करणारे संदीप क्षीरसागर मात्र या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांना लक्ष केले.. या प्रकरणात एसआयटीची स्थापन करून आरोपींचे सीडीआर तपासण्याची मागणी मुंडेंनी केली..
बेल्सपाल्सी आजारामुळे धनंजय मुंडे मागील बरेच दिवस सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. धनंजय मुंडे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.. मात्र या दरम्यान ते भाषणांपासून दूर राहिले.. परंतु आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपले मौन सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांची कोंडी केली. धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाईची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.
150 दिवस तुम्ही गप्प का बसलात? बजरंग साेनवणेंचा सवाल
या संपूर्ण प्रकरणाचे बीड जिल्ह्यात पडसाद दिसत असून अद्याप संदीप क्षीरसागर अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून आरोप करणे सोपे आहे. आरोप करताना त्याला पुरावा असणं गरजेचं आहे.. 150 दिवस तुम्ही का गप्प बसलात? असा सवाल खासदार सोनवणे यांनी उपस्थित केला.. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडे आता मात्र विरोधकांना लक्ष करत आहेत. या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या निमित्ताने मुंडे विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर मुंडेंच्या सोबतीला आहेत..
हेही वाचा:























