अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावल्याप्रकरणी भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी बॅनरही काढण्यास सांगितला
Nagpur : नागपूरच्या (Nagpur) रामनगर चौकावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावल्या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nagpur : नागपूरच्या (Nagpur) रामनगर चौकावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावल्या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामनगर चौकात आज सकाळी अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावण्यात आले होते. त्याच्यामध्ये अनिल देशमुख यांच्याबद्दल वसुली बुद्धी असा संदर्भ लिहून त्यांना तुरुंगात दाखवण्यात आले होते.
धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 4, 2024
महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे व खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्या कडून पाहायला मिळाला.
लक्षात असू द्या...
जनता जनार्दन हैं!@BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis @BJPmaharashtra
धन्यवाद,… pic.twitter.com/Od6h8jStr4
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली
पोलिसांनी संपूर्ण घटनेची शहानिशा करून संबंधित होर्डिंग काढायला लावले आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे हे होर्डिंग लावण्यात आल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत यांच्यासह इतर सहकारी तसेच होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजकारण असो किंवा समाजकारण, टिका टिपण्णीचाही एक स्तर असतो. वैयक्तिक पातळीवर उतरणारे वैचारीक दृष्टीने अगोदरच पराभूत झालेले असतात. असो, ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा!@Dev_Fadnavis https://t.co/kgHZEKylli
— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2024
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांचे एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप
माझ्यावरील 3 वर्षापुर्वी परमविर सिंग आणि सचिन वाझे (Sachin vaze) याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पि.ए. ने मला पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबडयावर राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आलीय, असा घणाघात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता.
विरोधी पक्षातील नेत्याच्या सांगण्यावरून एक पोलीस अधिकारी सत्तेतील गृहमंत्र्यांवर आरोप लावेल, असे शक्य आहे का? एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या नोकरीची काळजी असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे कपोल कल्पित आरोपांना कुठलाही अर्थ नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोपांचे खंडन करत परत एकदा निशाणा साधला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा, मेहरबानी करा; अजितदादांचे आवाहन