Shiv Sena vs BJP : अंधेरीत जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद, SRPF सह MIDC पोलीस तैनात
Shiv Sena vs BJP : अंधेरी येथील पंप हाऊसजवळ अंबिका टॉवरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यावरुन शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
![Shiv Sena vs BJP : अंधेरीत जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद, SRPF सह MIDC पोलीस तैनात Andheri East Bypoll Shiv Sena vs BJP Dispute between Shiv Sena and BJP over hiring of PR office in Andheri Shiv Sena vs BJP : अंधेरीत जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद, SRPF सह MIDC पोलीस तैनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/802d44e1c18bb9f4a6cd2bffc99115c6166433186111883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Sena vs BJP : शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच आता या मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी येथील पंप हाऊसजवळ अंबिका टॉवरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यावरुन शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी इथे राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह एमआयडीसी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या हे कार्यालय बंद ठेवलं आहे.
भाजपचे (BJP) माजी नगरसेवक मुरजी पटेल हे या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी अंबिका टॉवरमधील तळमजल्यावर जनसंपर्क कार्यालय भाड्याने विकासकाकडून घेतले होते तर शिवसेनेने देखील हेच कार्यालय एजंटच्या मार्फत घेतले. मात्र यामुळे वाद निर्माण झाला होता. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले होते. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटवला आहे. सध्या या कार्यालयाजवळ शांतता असली तरी मात्र इथले वातावरण तणावाचे बनलेले आहे.
पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा भाजपकडे
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेऊन पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.
दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने रमेश लटके यांचं निधन
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी 11 मे 2022 संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.
संबंधित बातम्या
Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा थेट भाजपकडे
Ramesh Latke : गटप्रमुख ते आमदार! दांडगा जनसंपर्क; रमेश लटकेंचा अफलातून राजकीय प्रवास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)