एक्स्प्लोर

Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा थेट भाजपकडे

Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आपला उमेदवार उभा करणार होता. परंतु आता शिंदे गटाची ही जागा भाजपने आपल्याकडे घेतल्याचं समजतं. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Andheri East Bypoll : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. शिंदे गट (Shinde Group) या विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार होता. परंतु आता शिंदे गटाची ही जागा भाजपने आपल्याकडे घेतल्याचं समजतं.

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेऊन पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपने मुरजी पटेल यांना या मतदारसंघांमधून उमेदवारी दिल्याचं कळतं.

दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने रमेश लटके यांचं निधन
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी 11 मे 2022 संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.

कोण आहेत मुरजी पटेल?
- मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 
- राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. 
- त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. 
- आता पोटनिवडणुकीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याचं समजतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकतेNagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढलीABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget