एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम

Amit Shah: अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत नागपूरमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये, विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि मार्गदर्शन केले.

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राष्ट्रीय पक्षांचे नेते राज्यातील नेत्यांसमेवत बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भाजपच्या (bjp) कार्यकर्ता संवाद बैठकीसाठी नागपुरात आलो होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचले त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन बैठकीची रीतसर सुरुवात करण्यात आली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अमित शाह (Amit shah) यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच, निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने काही सूचना देखील केल्या आहेत. विशेष म्हणजे महायुतीत आणि भाजपात उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी बंडखोरी न करण्याचं त्यांनी बजावलं आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराच शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत नागपूरमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये, विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि मार्गदर्शन केले. मतदारसंघातील बूथवर विशेष लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी पदाधिकारी व नेत्यांना केलं आहे. तर, भाजपला विदर्भच महाराष्ट्राची निवडणूक जिंकून देईल, असे अमित शाह यांनी म्हटल्याचे नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.

गटबाजी अजिबात चालणार नाही

गाव पातळीवर निवडणूक हरलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करा. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ वर दहा टक्के मत वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नेते हेदेखील पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, प्रत्यक्ष बुथवर जाऊन काम करावं लागेल अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीत कानपिचक्या दिल्या. प्रत्येक बूथवरील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष केंद्रित करा, त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा. भाजपात विधानसभा निवडणुकांवेळी मतदारसंघात गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार आहे. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराजी हे मी बिलकुल सहन करणार नाही, अशा शब्दात राजी-नाराजीवर अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिलाय.  

नवरात्रीपासून कार्यकर्त्यांनी फिरावं

पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस आहेत, त्यात नवरात्रीमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असणार आहे. यावेळ, कार्यक्रम व उत्सवासाठी लोकं एकत्र येतात. त्यामुळे, विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्ते फिरले पाहिजे, अशा सूचनाही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केल्याची माहिती नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली. 

26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा दौरा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा देखील होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसानंतर एस.पी. कॉलेजच्या मैदानावर पाणी साचलं असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.

हेही वाचा

Rain update : पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget