Amol Kolhe : जनतेच्या करातून मिळालेल्या पैशातून सरकारची इव्हेंटबाजी, 270 कोटींच्या जाहिराती करण्याची काय आवश्यकता? अमोल कोल्हेंचा सवाल
Amol Kolhe, Ahmednagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेषांतर करून प्रवास केल्याचं अनौपचारिक बोलतांना म्हटलं यावर सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Amol Kolhe, Ahmednagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेषांतर करून प्रवास केल्याचं अनौपचारिक बोलतांना म्हटलं यावर सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी अनौपचारिक बोलतांना पत्रकारांना हे सांगितलं होतं का पत्रकारांनी विपर्यास केला? हे आधी स्पष्ट केलं पाहिजे. जर पत्रकारांनी विपर्यास केला असेल तर ठीक नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलय. ते अहमदनगर येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सामान्य जनतेच्या करातून मिळालेला पैसा फक्त इव्हेंट करण्यामध्ये खर्च केला
नवीन संसदेमध्ये पाणी गळती सुरू झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत, आता अमोल कोल्हेंनी याबाबत भाष्य केलंय. एनडीए सरकारकडून चाललेला हा इव्हेंटचा कार्यक्रम आहे. सामान्य जनतेच्या करातून मिळालेला पैसा फक्त इव्हेंट करण्यामध्ये खर्च केला जातोय. वस्तुस्थिती काय आहे हे तुम्ही पाहात आहात. हे केवळ केंद्रातच नाहीत तर राज्यातही सुरू आहे. लोकहिताच्या योजना राज्य सरकारने आणल्या असतील तर 270 कोटींच्या जाहिराती करण्याची काय आवश्यकता आहे? असा सवाही अमोल कोल्हे यांनी केलाय.
देशात NDA चं असून बिहार आणि आंध्रप्रदेशला चांगला निधी मिळाला
अर्थ संकल्प अधिवेशनात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं हे सर्वसामान्य जनता विचारत आहे. देशात NDA चं असून बिहार आणि आंध्रप्रदेशला चांगला निधी मिळाला, या बद्दल कोणाचं दुमत नाही. मात्र महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडून नवीन सरकार आणलं हे एवढं सर्व करून या पक्षांना काय दिल? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे महाराष्ट्राला काय मिळालं याची उत्तर जनता राज्य सरकारला विचारणार असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली या राष्ट्रीय महामार्गासाठी गेली ३-४ वर्ष अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागली. सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपताच या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या. अशा परिस्थितीत मी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागला नाही तर भावनांचा उद्रेक होईल ही बाब लक्षात घेऊन सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत या संसद अधिवेशनात केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याची मागणी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
राज्यातल्या जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण होणार, 16 प्रकल्प खासगी संस्थांना देणार