एक्स्प्लोर

परभणीत तरुणाच्या मृत्यूनंतर 'महाराष्ट्र बंद'ला अंबादास दानवेंचा पाठिंबा म्हणाले, 'SP- जिल्हाधिकाऱ्यांना निलंबीत करा'

Ambadas Danve: सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संशयाचे वातावरण तयार झाले असून आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्या 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Parbhani: परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संशयाचे वातावरण तयार झाले असून आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्या 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.  या महाराष्ट्र बंदला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दर्शवलाय. या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केलीये. या प्रकरणामुळे परभणीत वातावरण तापण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले, दलित संघटना उद्या बंद पुकारात आहेत. त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत. यासंदर्भात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली. बैठकीत निर्णय झाल्याचं ते म्हणाले. 

नक्की प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या हिंसाचाराच्या आणि दगडफेकीच्या घटनेत 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात 35 वर्षे एका तरुणाचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला आहे. छातीत कळ आल्याने या तरुणास दवाखान्यात नेण्यात आले, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला, सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेला उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीचे IG  शहाजी उमाप यांनी परभणीकरांना शांतता राखण्याचा आवाहन केलंय. या प्रकरणाने राजकीय घटनांना वेग आला आहे. परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र बंदमागे या मागण्या 

परभणीत झालेल्या घटनेनंतर 16 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे व्हावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, शाहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, या मागण्या सरकारसमोर केल्या जाणार आहेत.

संबंधित बातमी-

परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक, आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी मागणी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Embed widget