एक्स्प्लोर

छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना अंबादास दानवेंचं मोठं भाकीत, 'काहीही होऊ शकतं' म्हणत, दिली हिंट!

राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना अंबादास दानवे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते भाजपात जाऊ शकतात, असं दानवे म्हणालेत.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्यात आलंय. याच कारणामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी तर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच भाजपात जातात की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. असे असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं भाकित केलंय. 

अंजली दमानिया जे बोलल्या ते योग्य बोलल्या

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवरून राज्य सरकारला घेरलं. त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केलं. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या शक्यतेवर बोलताना दानवे म्हणाले की, काहीही होऊ शकते. ज्या पद्धतीने भुजबळ व्यक्त होत आहेत ते पाहता अजित पवार यांच्यासोबत राहतील असे वाटत नाही, असे भाकित त्यांनी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भुजबळ यांची भेट होत नाही पण भुजबळ आणि फडणवीस यांची भेट मात्र होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलल्या आहेत, ते बरोबर आहे, असंही दानवे म्हणाले. 

हालहाल करून संतोष देशमुख यांचा खून

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणावरही दानवे यांनी सरकारवर टीका केली. बीड प्रकरणात आरोपी सरकाला सापडत नाहीये. सरकार गंभीर पावलं उचलत नाहीये. संतोष देशमुख यांना हालहाल करून त्यांचा खून करण्यात आला. आरोपी आणि पोलीस यांचे व्हिडीओ समोर आले होते. बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :

Deepak Kesarkar: मंत्री अन् माजी मंत्र्यांमध्ये जुंपली; दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती; मुंबई, ठाणेसह पुण्यातील मार्गांसाठी MMRDAला भरघोस निधी

शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP MajhaBuldhana Lonar Lake Update : लोणार सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, भूस्खलन होत असलेल्या भागाची पाहणी होणारNDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget