शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
Shivendraraje Bhonsle: शरद पवार यांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केलाय. असे वक्तव्य करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
Shivendraraje Bhonsle सातारा : खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केलाय. असे मोठे वक्तव्य करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी शरद पवारांवर केला आहे. कराडमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्म ते सीनियर होते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले संयमी नेतृत्व होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नव्हते. मात्र असे असूनही खासदार शरद पवार यांनी त्यांना का बाजूला ठेवले? हा विषय सोडून देऊ. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांना बाजूला ठेवल्याने जसे त्यांचे नुकसान झाले, तसेच जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले.
स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांना पद मिळाले असते तर सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न त्याचवेळी सुटले असते. उरमोडी धरण भाऊसाहेब महाराज होते म्हणूनच झाले. या धरणातून आज सातारा माण खटाव या भागाला पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान झाल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रामराजे म्हणजे फलटण नवे, तेथील जनता म्हणजे फलटण आहे- जयकुमार गोरे
राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासोबत मंगळवारी दुपारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली. रामराजे नाईक निंबाळकर यांना स्वतःला ते कोणत्या पक्षात आहेत, हे माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. फलटण म्हणजे केवळ रामराजे नाही, तर तेथील जनता म्हणजे फलटण आहे. आणि आम्ही जनतेसोबत आहोत हे लक्षात घ्या, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा