एक्स्प्लोर

'विखे पाटलांना कोरोना काळ लागलाय', आमदार नितीन देशमुखांचा टोला, मिटकरींच्या प्रतिक्रीयेनंतर ठाकरे गट आक्रमक, घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन

राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी केली होती. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Akola News: अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) 'ऑनलाइन पालकमंत्री' असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी लगावलाय. आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) प्रतिक्रीयेनंतर आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलंय.

राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी केली होती. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून पालकमंत्री विखे पाटलांचा विरोधात त्यांनी घोषणाबाजीसह ठिया आंदोलनही केलंय.

विखे पाटील ऑनलाइन पालकमंत्री- आमदार नितीन देशमुख

अकोल्यात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे कळताच आमदार नितीन देशमुख यांनी विखे पाटलांवर चांगलाच निशाणा साधलाय. यावेळी विखे पाटील हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करत ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. विखे पाटलांना आता कोरोना काळ सुरू झाला असेल म्हणूनच ऑनलाईन बैठका घेत असल्याचा टोला आमदार नितीन देशमुख यांनी लगावलाय. 

अकोल्यात  आता युतीतील घटक पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांच्या नाराजीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गट अकोल्याचे पालकमंत्री ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करताना दिसतायत.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर ठाकरे गट अकोल्यात चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय. राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याला वेळ देत नाहीयेत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली होती. दरम्यान अकोल्यात आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइनच उपस्थित राहणार असल्याचे कळताच ठाकरे गटाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत ठिय्या आंदोलन केलंय.

अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंध जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर पोलीस भरतीचाही घोळ कायम आहे. तसेच, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले. जिल्ह्यातील प्रश्न आम्ही बोलायचे कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात मी पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झालेला नाही."    

हेही वाचा:

Amol Mitkari on Vikhe Patil: विखे पाटील 'ऑनलाईन पालकमंत्री'; त्यांच्याऐवजी भाजपच्या या आमदाराला पालकमंत्री करा; अमोल मिटकरींची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
कंलक्या...  आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
कंलक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळेAmol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोपABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सJitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
कंलक्या...  आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
कंलक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Fact Check : दिल्लीच्या रस्त्यांवर खड्डे दाखवण्यासाठी दिल्ली भाजपकडून एडिटेड फोटो शेअर, जाणून घ्या सत्य
दिल्ली भाजपकडून रस्त्यावरील खड्डे दाखवण्यासाठी एडिटेड फोटो शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Embed widget