Fact Check : दिल्लीच्या रस्त्यांवर खड्डे दाखवण्यासाठी दिल्ली भाजपकडून एडिटेड फोटो शेअर, जाणून घ्या सत्य
Fact Check : व्हायरल फोटोत नवी दिल्लीतील एनएसआयसी कॉम्प्लेक्सजवळ बाह्य रिंगरोडवर खड्डे असल्याचं दाखवलं जातं. दिल्ली भाजपकडून फोटो एडिट करुन पाण्यानं भरलेले खड्डे दाखवण्यात आलेत.
Fact Check
निर्णय : फेक
व्हायरल फोटोला एडीट करुन पाण्यानं भरलेले खड्डे दाखवण्यात आले आहेत. खरा फोटो सप्टेंबर 2024 मधील आहे ज्यात केवळ एक खड्डा दिसतो.
दावा नेमका काय?
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अधिकृत एक्स खात्यावरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांतून दुचाकी चालवत जात असताना पाहायला मिळतं. यासोबत एक दावा करण्यात आला की नुकत्याच झालेल्या जोरदार पावसानंतर देशाची राजधानी दिल्लीतील फोटो आहे. फोटोवर लिहिलेलं पाहायला मिळतं की आपचं असत्य, लंडन पॅरिस सारखे रस्ते, दिल्लीचं वास्तव रस्त्यावर खड्डे...
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील फोटो शेअर म्हटलं की थोड्या पावसानंतर, याशिवाय भाजपशी संबंधित इतर एक्स खात्यांवरुन आणि पार्टीच्या नेत्यांकडून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. जो तुम्ही इथं, इथं आणि इथं पाहू शकता. 28 डिसेंबर 2024 ला दिल्लीत डिसेंबर महिन्यातील 101 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, व्हायरल फोटो एडिटेड असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. खरा फोटो 30 सप्टेंबर 2024 चा असून त्यामध्ये खड्ड्यात पाणी भरलेलं दिसून येत नाही.
सत्य कसं समोर आलं?
व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधलं असता गेट्टी इमेजेसमध्ये खरा फोटो मिळाला. ज्यामध्ये रस्त्यावर केवळ एक खड्डा दिसून आला. व्हायरल फोटोत पाण्यानं भरलेले अनेक खड्डे पाहायला मिळतात. मूळ फोटो (अर्काइव्ह लिंक) ज्याचं हेडिंग होतं, "दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी ईणि इतर मंत्र्यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसोबत रस्त्याच्या स्थितीची पाहणी केली.हा फोटो 30 सप्टेंबर 2024 ला अपलोड करण्यात आला होता. जो नुकत्याच झालेल्या डिसेंबरमधील पावसाूप्रवीचा आहे.
जेव्हा आम्ही मूळ फोटो आणि व्हायरल फोटोंची तुलना केली तेव्हा, दोन्हीमध्ये एकच दुचाकीस्वार बॅग घेऊन जाताना पाहायला मिळतो. बॅकग्राऊंड देखील सारखंचं होतं. मात्र, दुचाकीवर बसलेल्या दुचाकीस्वाराच्या हेल्मेटचा रंग वेगळा आहे, नंबरप्लेट देखील स्पष्टपणे दिसत नाही. दोन्ही फोटोमध्ये इतर गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळं हे स्पष्ट होतं की फोटो एडिटेड आहेत.
गेटी इमेजच्या कॅप्शननुसार हा फोटो नवी दिल्लीतील एनएसआयसी कॉम्प्लेक्स जवळच्या बाह्य वळण रिंग रोडवरील एक खड्डा दाखवते. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत 30 सप्टेंबरला रस्त्यांची पाहणी केली होती. तेव्हाचा फोटो आहे. त्याच दिवशी गेटी इमेजनं वेगळ्या अँगलनं दूरच्या अंतरावरुन घेतलेला दुसरा फोटो अपलोड केला होता. ज्यामध्ये तोच रस्ता दिसून येतो. त्यामध्ये पाण्यानं भरलेले खड्डे दिसत नाहीत. मात्र, व्हायरल फोटोत खड्ड्यात पाणी दिसून येतं.
याशिवाय 1 ऑक्टोबर 2024 च्या द हिंदूच्या एका आर्टिकलमध्ये देखील आतिशी आणि मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी रस्त्यांची डागडुजी आवश्यक असलेल्या भागांची पाहणी 30 सप्टेंबरला केल्याचं म्हटलं. दिल्ली सरकारकडून खड्डे मुक्ती दिल्ली अभियान राबवण्यात आलं होतं. त्याअंतर्गत पाहणी करण्यात आली होती.
निर्णय
गेटी इमेजेस वर अपलोड करण्यात आलेल्या मूळ फोटोत केवळ एक फोटो दिसत आहे. भाजपकडून किंवा दिल्ली भाजप आणि इतर नेत्यांकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोला एडिट करुन त्यात पाणी दाखवण्यात आलं होतं.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टसवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]