एक्स्प्लोर

कलंक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले

जो स्वतःच्या काकाचा मान ठेवत नाही, तो जनतेचा काय मान ठेवील? मराठा नावाला कलंक.! स्वयंघोषित दादा.! अशा आशयाचे ट्विट आमदार क्षीरसागर यांच्या कार्यालयीन अकाऊंटवरुन करण्यात आले होते

मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं असून आता नेतेमंडळींकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. त्यातच, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारांच्या भाषेचा स्तर खालावल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आलं असून धनंजय मुंडेंना मोठे आका म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज माध्यमांसमोर सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवसांपूर्वी धस यांनी वाल्मिक कराडशी फोनवरुन संपर्क केल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे धस विरुद्ध मिटकरी असा सामना रंगला असताना, ट्विटरवरुन मिटकरी विरुद्ध क्षीरसागर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतान आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना चक्क कलंक्या असे म्हटलं आहे. 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली होती. त्यावेळी, अजित पवार हे मराठा नावाल कलंक असल्याची टीकाही एका नेत्यानं केली होती. त्यानंतर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भाने एक ट्विट करण्यात आलंय. आता, आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर दिलं आहे.    

जो स्वतःच्या काकाचा मान ठेवत नाही, तो जनतेचा काय मान ठेवील? मराठा नावाला कलंक.! स्वयंघोषित दादा.! अशा आशयाचे ट्विट आमदार क्षीरसागर यांच्या कार्यालयीन अकाऊंटवरुन करण्यात आले होते. त्याला उत्तर देताना आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना कलंक्या म्हटलं आहे. ''कशाला अक्कल पाजळतोस? तुझ्या वडिलांबद्दल तुझी वागणूक अख्ख्या देशाने बघीतली आहे. तू तर मानव जातीला कलंक आहेस. आपली लायकी पाहून वागत जा. मराठा व इतर सर्व बहुजन समाजात आई-वडील श्रेष्ठ मानल्या जातात. तू नेता व्हायच्या लायकीचा आहेस का, आरशात बघ जरा #कलंक्या'', अशा शब्दात मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या टीकेवर पलटवार केला आहे. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणावरुन आमदार मिटकरी व संदीप क्षीरसागर यांच्यातच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
कंलक्या...  आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
कंलक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळेAmol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोपABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सJitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
कंलक्या...  आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
कंलक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Fact Check : दिल्लीच्या रस्त्यांवर खड्डे दाखवण्यासाठी दिल्ली भाजपकडून एडिटेड फोटो शेअर, जाणून घ्या सत्य
दिल्ली भाजपकडून रस्त्यावरील खड्डे दाखवण्यासाठी एडिटेड फोटो शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Embed widget