एक्स्प्लोर

Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला

Ajit Pawar on Yugendra Pawar : 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, मला 1991 ला तिकीट दिलं, आता लोकांनी काम सुरू केलं नाहीतर लगेच यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागलीत, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधलाय

Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही मी राज्याचा उपमुख्यमंत्री (Deputy CM), साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी पुतणे आणि त्यांच्या विरोधात बारामतीतून (Baramati) विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवणाऱ्या युगेंद्र पवारांवरही निशाणा साधला आहे. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर (Yugendra Pawar) निशाणा साधला आहे. तसेच, 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, मला 1991 ला तिकीट दिलं, आता लोकांनी काम सुरू केलं नाहीतर लगेच यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागलीत, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला आहे.
बारामती लोणी भापकर इथल्या सभेत अजित पवार बोलत होते. 

काही लोकांनी काल काम सुरू केलं, त्यांना आता आमदारकीची स्वप्न पडतायत : अजित पवार 

अजित पवार बोलताना म्हणाले की, "आपल्या तालुक्यातील मुलं काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या-गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नव्या चेहऱ्यांना मी पुढे आणेल." पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा  होईल ते बघितलं? 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, 91 ला मला तिकीट दिलं. आता काही लोकांना काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत."

मला इंग्लिश न येऊनही, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो  माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, पुढे बोलताना मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे, असा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला आहे. 

मागे साहेबांना खुश केलं, आता मला करा : अजित पवार 

अजित पवार म्हणाले की, "मी जेवढं काम करू शकतो, तेवढं महाराष्ट्रमधील एकही आमदार काम करू शकत नाही. मी एकटा निवडून येऊन काय उपयोग नाही. माझे सहकारी निवडून येणं गरजेचं आहे. जेवढे निवडून येतील तेवढी माझी ताकद वाढेल. त्याचा फायदा बारामती आणि जिल्ह्याला होणार आहे. मोदींसमोर सांगितलं मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं पुढं चाललो आहे. जातीत तेढ निर्माण झाला नाही पाहिजे, गाव पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, मागे साहेबांना खुश केलं आता मला करा. मी सगळ्या समाजाला जागा दिल्यात. मी शाहू फुले अमबेडकर यांचे नाव घेतो तशा जागा दिल्या. बाकीच्यांनी तसे केलं नाही. धनगर समाजाला एसटी मध्ये जागा मिळत नाही, म्हणून त्यांना ताशा सवलती दिल्या. इतकी वर्षं पर्याय नव्हता पण आता पर्याय आहे. आता काय झालं की चाललो तिकडे. औटघटकेचा विचार करु नका. मी तुमचे मत वाया जाऊ देणार नाही. विश्वासाल तडा जाऊ देणार नाही,  कोळी राष्ट्रसंघाच्या वतीनं मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget