एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बारामतीतच दादांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, भाजप आक्रमक

संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. त्यावरुन भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

बारामती, पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी भाजपसह विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामतीतील (Baramati) निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. अजित पवारांच्या सहयोग सोसायटीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.  संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. त्यावरुन भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला (Baramati Protest against Ajit Pawar)

दरम्यान, बारामतीतच अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात  घेतलं. नागपूर अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता. 
बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला. यावेळी अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. अशा घोषणा देण्यात आल्या.  

भाजपच्यावतीने भिगवन चौकात (Bhigwan) आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

माजी खासदार संभाजीराजेही आक्रमक

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजेही आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत हे नक्की आहे. संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केलं हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळे संभाजी महाराज हे धर्मवीर होते, असं संभाजीराजे म्हणाले.

मी नेहमी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून भाषणाची सुरुवात करतो यापुढे देखील करेन. अजित पवार यांनी कोणता संदर्भ देऊन ते बोलले हे माहीत नाही.
अभ्यास असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य करू नये. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचे आहे, असंही संभाजीराजेंनी सांगितलं. 

धुळ्यात अजित पवारांचा पुतळा नदीत सोडला 

तिकडे धुळ्यात अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा नदीत सोडून निषेध नोंदवण्यात आला.  भाजपच्यावतीने अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा पांझरा नदी पात्रात कडेलोटकरत अनोखे आंदोलन करण्यात आले. 

नाशिकमध्येही आंदोलन (Nashik Protest)

दरम्यान, तिकडे नाशिकमध्येही भाजपने आक्रमक भूमिका घेतली.  भाजप कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा परिसरात आंदोलन केले. अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच नाशिकमध्येही अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अजित पवारांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केली. 

शिंदे गटाकडूनही अजित पवार यांचा निषेध 

संभाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ, नाशिकमध्ये आज आंदोलन करण्यात आले. गंजमाळ परिसरात  अजित पवारांच्या फलकाला जोडो मारो आंदोलन करत अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाचे महानगरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? (Ajit Pawar statement)

आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात, पण राजे धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मी मंत्रिमंडळात असताना नेहमी सर्वांना सांगायचो, छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करावा, असं अजित पवार म्हणाले होते. 

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल (Devendra Fadnavis on Ajit Pawar)

दरम्यान, अजित पवार यांच्या विधानावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. "छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्हीचे रक्षण केले. औरंगजेब त्यांना धर्मांतर करा असं म्हणत होता. पण त्यांनी धर्मांतर केलं नाही. संभाजी महाराजांच्यादेहाचे अक्षरशः तुकडे केले. पण संभाजीराजेंनी स्वधर्म सोडला नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरीही छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Ajit Pawar Video on Sambhaji Maharaj : अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? 

- 

संबंधित बातमी  

Sambhajiraje on Ajit Pawar : अजित पवारांनी कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये; संभाजीराजे छत्रपतींकडून सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget