एक्स्प्लोर

तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार, आता रिटायर व्हा, दुसरे नेतृत्व तयार करा; ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला

अजित पवार यांनी के पी पाटील यांना सल्ला देत असतानाच मेहुण्या-पाहुण्यांमधील वादावर नजर टाकली. तुम्ही दोघेही भांडत बसता याला काही अर्थ नाही.

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंदगड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा नागरी सत्कार होता, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार आणि सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले के पी पाटील यांनी भेट घेतली. के पी पाटील हे पुन्हा एकदा अजितदादा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ के पी पाटील यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित करणे बाकी आहे. मात्र, आज अजित पवार यांनी के पी पाटील यांची चांगलीच कान उघाडणी केली. के पी तुम्ही आता कुठेतरी थांबायला पाहिजे, 2029 सालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तुम्ही 84 वर्षाचे होणार आहात. त्यामुळे, आता रिटायरमेंट घ्या आणि नवं नेतृत्व तयार करा, असा सल्ला अजित पवारांनी (Ajit pawar) दिला.

अजित पवार यांनी के पी पाटील यांना सल्ला देत असतानाच मेहुण्या-पाहुण्यांमधील वादावर नजर टाकली. तुम्ही दोघेही भांडत बसता याला काही अर्थ नाही. कुणीतरी माघारी घेतलं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र, तसं न करता वाद घालत बसता, असेही अजित पवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडताना शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. कुटुंब प्रमुखांनी कुठतरी थांबलं पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे असे अजित पवारांनी म्हटलं होतं. आज, कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळीही अजित पवारांनी तीच भूमिका परखडपणे बोलून दाखवली. 

के पी पाटील पुन्हा पक्ष बदलणार?

माजी आमदार के पी पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मात्र पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा यांना केपी यांनी शुभेच्छा दिल्या... त्यानंतर काही दिवसातच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले...त्यावेळी के पी पाटील यांनी त्यांचे देखील स्वागत केले... तुम्ही नेमके कोणत्या गटाचे आहात हे विचारतात मी पवार गटाचा असल्याचे उत्तर के पी यांनी दिले होते... त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राधानगरी भुदरगडची जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला गेली... त्यामुळे के पी पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीला उभा राहीले... इतकच नाही तर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पहिली सभा के पी पाटील यांच्यासाठी घेतली होती... तेच के पी आता पुन्हा एकदा अजित पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे...

जिल्हा बँकेमध्ये मी थांबलो आणि चिरंजिवाला संधी दिली- के पी पाटील

अजितदादा के पी पाटील यांना रिटायर होण्यासंदर्भातल्या सल्ला देत होते. हे सगळं इतरांना झेपले पाहिजे, त्यामुळे मी उभा राहतो. मात्र, जिल्हा बँकेमध्ये मी थांबलो आणि चिरंजिवाला संधी दिली आहे. असं स्पष्टीकरण के पी पाटील यांनी अजितदादांना दिलं. मी आणि मुश्रीफ साहेबांनी त्यांना उभारी दिली, असेही के पी पाटील यांनी म्हटले. ए वाय पाटील यांना मी आणि मुश्रीफ साहेब यांनीच उभारी दिली आहे. आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात आम्ही दोघांनी त्यांना मोठे केलं आहे. कोल्हापूर जिल्हा बँक असो किंवा बिद्री सहकारी साखर कारखाना असो त्या ठिकाणी आम्हीच ए वाय पाटील यांना संधी दिली आहे. महत्वाची पद आमच्या माध्यमातूनच दिली आहेत, असेही केपींनी म्हटलं. 

हेही वाचा

देशाच्या पहिल्या नौदल प्रमुखांच्या लेकीचं हिमांशीला पत्र; तू, सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद!

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Shambhuraj Desai : साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?
सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना 3 सदस्यांवरुन 15 वर कशी पोहोचली? शंभूराज देसाईंनी सेनेचा प्रवास मांडला

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget