राष्ट्रवादी हा पक्ष सेक्युलर विचारधारेचा, महायुतीमध्ये सोलून काढण्याची भाषा करू नये; अमोल मिटकरींचा आशिष शेलार यांना सल्ला
नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलंय. आता त्याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आशिष शेलार यांना सल्ला दिला आहे.
नागपूर : नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलंय. नाशकातील मेम रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेकीची घटना घडलीय. दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली होती. यावेळी काहीकाळ तानावाचे वातावरण नाशकात बघायला मिळाले आहे. तर या प्रकारावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य करताना मोर्चाला विरोध करतात त्यांच्या पाठी सोलून काढा, असे आवाहन पोलिसांना केले होते. आता त्याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आशिष शेलार यांना सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा आहे- अमोल मिटकरी
पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीचे मोर्चे निघणे योग्य नाही. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना हिंदु मुस्लिम एक आहोत, असे आपण म्हणतो. मात्र असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात असे राडे होणे देशाला शोभणारे नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात दखल घेत कारवाई करावी. अशी मागणी अमोल मिटकरींनी केलीय. कोणीतरी चिंथावणी देत आणि त्यामुळे तेढ निर्माण होते. राष्ट्रवादी पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा आहे. असं कृत्य होताना महायुतीमध्ये सोलून काढण्याची भाषा करू नये. आशिष शेलार नेमके कशावर बोलले हे माहित नाही पण त्यांनी असं बोलणं टाळावं. असा सल्ला आमदार अमोल मिटकरींनी आशिष शेलार यांना दिला आहे.
तोंडाचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो
ज्या व्यक्तीचा नरडा दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यासाठी वळवळत असतो, त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द आला, त्यात काही गैर वाटत नाही. अजित पवार बद्दल बोलत असतील तर तोंडाचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी साप ज्यांनी ठाकरे आणि पवार कुटुंब फोडले त्यांनी सुप्रिया आणि अजित दादा या बहिण भावाचा नात्यावर बोलू नये. एक दिवस उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवल्या शिवाय ते राहणार नाही. अशा शब्दात आमदर अमोल मिटकरींनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचावर निशाणा साधलाय. संजय राऊत निवडून आल्यावर त्यांनी गुलाब उधळला असेल. हिंदू धर्मात गुलाबी हा पूजनीय रंग आहे. तिकडे हिंदुत्वाचा उर बडवायचा आणि दुसरीकडे त्या रंगावर टीका टिपणी करायची. महाविकास आघाडीचा पराभव होताना दिसल्याने ते आपल्या तोंडाचा पट्टा चालवतात. महा सन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असतो, हे संजय राऊत यांना दाखवा. असेही ते म्हणाले.
कर्जत जामखेडच्या आमदाराला पराभव दिसत आहे
लाडकी बहीण योजनेसाठी किती कोटी खर्च झाले, हे खर्च करणारे बघतील. मुस्लिम तरुण उच्चशिक्षित व्हावे त्यासाठी हजार कोटीचा फंड महायुतीने दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मत मिळाले ते आता विधानसभेत मिळणार नाही, हे शल्य उद्धव ठाकरे यांना असल्यामुळे ते टीका करत असल्याचा पलटवार देखील अमोल मिटकरींनी केलाय. तर बारामतीतून कोण लढणार यासाठी पारलामेंट्री बोर्ड हे निर्णय घेईल. बारामतीतून जय पवार लढण्यात इच्छुक असेल तर त्यावर बोर्ड ठरवतील. कर्जत जामखेडच्या आमदाराला पराभव दिसत आहे. त्या ठिकाणी विद्यमान आमदार राम शिंदे हे लढत होते. ते घाबरले असल्यामुळे ते नैराश्यातून बोलत असल्याची टीकाही अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर केलीय.
हे ही वाचा