Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!
Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली. पुण्यातील पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद पुण्याच्या पवना धरणात दोघांचा बुडून मृत्यू झालाय. कोणाला न सांगता बोटी पाण्यात घेऊन उतरण्याची चूक त्यांच्या जीवावर बेतली. बोट अचानक पलटली अन यात एक जण बुडू लागला, मग दुसऱ्या बोटीतून वाचवण्यासाठी मित्र त्याच्याजवळ पोहचला. मात्र यात दोघे ही बुडाले. ही घटना तिसऱ्या मित्राच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीये. इतर मित्रांना हे दोघे नाटक करत असल्याचं वाटलं. पण खरंच हे दोघे बुडालेत, हे समजलं तेंव्हा उशीर झाला होता. वन्यजीव रक्षक पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. रवींद्र भारसाके आणि तुषार आहिरे अशी या पर्यटकांची नावे असून ते भुसावळ येथील रहिवासी आहेत. सध्या कामानिमित्त ते बालेवाडी क्रीडांगण परिसरात रहात होते. मित्रांसोबत पर्यटनासाठी आले तेंव्हा ही घटना घडली.