एक्स्प्लोर

सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत पवार, शिंदे, फडणवीसांचं नाव पुसलं जाणार नाही; सुनिल तटकरेंकडून फुल्ल कौतुक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव देण्यात आलेल्या एका सीबीएसई शाळेच्या उद्घाटन सोहळा पार पडला.

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असून रायगड (Raigad) पालकमंत्री पदावरुन महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका भाषणात तटकरेंनी भरत गोगावलेंची नक्कल करत मिश्कील टोला लगावला होता. तर, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून थेट नाव घेत सुनिल तटकरेंवर टीका करण्यात आली होती. मात्र, आज माणगाव येथील एका कार्यक्रमासाठी हे दोन्ही तटकरे व गोगावले एकाच व्यासपीठावर दिसून आले. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं पुसता येणार नाहीत, अशी स्तुतीसुमने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव मधील एका कार्यक्रमात केली. यावेळी व्यासपीठावर सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) आणि आमदार महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव देण्यात आलेल्या एका सीबीएसई शाळेच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना सुनिल तटकरे यांनी महायुतीमधील प्रमुख पक्षाच्या तिन्ही नेत्यांचं तोंड भरुन कौतुक केलं. सत्ता येत असते जात असते, परंतु मिळालेल्या सत्तेचा उपभोग घेत असताना ती कामं करण्यासाठी आहे. त्याच्यासाठी सत्तेच मूल्यमापन करायचं असतं ही भावना आपण अवलोकन करावी, असे तटकरे यांनी म्हटले. तटकरे यांनी नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनाच हा टोला लगावल्याची चर्चा या कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळा रंगली आहे. 

आम्ही गुवाहटीची परीक्षा पास झालो

माणगावमध्ये पहिल्यांदाच सीबीएससी शाळेचे उद्घाटन करण्यात आलं असून शिक्षण समाजासाठी महत्वाचे आहे.  जगाच्या स्पर्धात्मक युगात अशा शाळा पाहिजे. या शाळेला माझ्या मातोश्रींचे नाव दिल्यामुळे शाळा व्यवस्थापक आणि संस्थापक यांचे मी आभार मानतो. अशा क्षणी आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी याप्रसंगी म्हटले. श्रीकांत शिंदेला त्याच्या आईने डॉक्टर केलं, पण मी 12 वी मधून मागे गेलो. मात्र, आम्ही गुवाहाटीची परीक्षा पास झालो, असा मिश्कील टोलाही शिंदेंनी लगावला. श्रीकांत शिंदे यांना मी डॉक्टर केलं, श्रीकांत आज 4 देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा काम नरेंद्र मोदी यांनी चोखपणे केलं. आपल्याकडे आता पाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत. आपल्या देशाने आतंकवादी हड्डे उध्वस्त केले, पाकिस्तानमधील सर्वसामान्य माणसांना मारले नाही. याप्रसंगी, देशाने लष्कराच्या बाजुने उभे राहिले पाहिजे, असेही एकनाथ शिंदंनी म्हटलं. 

हेही वाचा

मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं; राज ठाकरेंची मागणी, उद्याच मनसेचा मोर्चा धडकणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Amol Mitkari : व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली?  पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धकाळ.. गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Embed widget