एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Poll of Polls | 6 PM)

Ramraje Naik Nimbalkar: अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार? रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना जमायला सांगितलं, शरद पवार गटात प्रवेश करणार?

ramraje naik nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, दीपक चव्हाणही तुतारी हाती घेणार. महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

मुंबई: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या नेत्यांच्या भक्कम मोळीतील एक-एक काठी सुटी करण्याचा शरद पवारांचा खेळ अजूनही सुरुच आहे. कारण महायुतीमधील आणखी एक सामर्थ्यवान नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात (Sharad Pawar Camp) प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.

कालच भाजपचे इंदापूर मतदारसंघातील नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात आणून शरद पवार यांनी अजितदादा गटाच्या दत्ता भरणे यांच्याविरोधात तगडा उमेदवार पक्षात जोडला होता. हा भाजप आणि अजित पवार गट दोघांसाठी मोठा धक्का ठरला होता. 

रामराजे निंबाळकर कुठेही जाणार नाहीत: अमोल मिटकरी

अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात जाण्याचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले की, ही अत्यंत चुकीची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा आजचा मेळावा कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी घेतलेला नाही. याचा अर्थ रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण शरद पवार गटात जाणार, असा होत नाही. तुतारी हे काय वैश्विक चिन्हं झालं आहे का? महायुतीचे नेते जरुर इतर पक्षांमध्ये जात आहेत. पण शरद पवार गटात बंपर भरती वगैरे सुरु नाही. रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीही काहीही चर्चा होऊ दे, मी दुसरीकडे जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल वेळ पडल्यास त्यांच्याशी चर्चा करतील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

आणखी वाचा

अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...

'अरे जरा जपून, तुला..', 5 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य खरे होणार? हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने काय साध्य होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : आमचं सव्वा 2 वर्षाचं सरकार बघा दूध का दूध पाणी का होईल; शिंदे कडाडलेAjit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषणDevendra Fadanvis Thane Speech : उद्धव ठाकरे ते राहुल गांधी, फडणवीसांची सडकून टीका; ठाण्यात भाषणPM Narendra Modi Thane : ठाण्यात मोदींचं खास फेटा , शाल देऊन स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget