एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...

Ajit Pawar : रामराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार यांनी फोन करुन भरसभेत उमेदवारी दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. फलटण हा अनूसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून यापूर्वी तीन टर्ममध्ये दीपक चव्हाण निवडून आले आहेत.  रामराजे नाईक निंबाळकर यांची   सोळशीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. 

साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधत आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. यापार्श्वभूमीवर  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट अजित दादा पवार यांनी फोन द्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत. अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा करताच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटलं. अजित पवारंनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा करुन लोकसभेला जे घडलं ते होऊ नये याची काळजी घेतल्याचं चित्र पाहायला मिळाला. 

अजित पवारांनी फोनवरुन संवाद साधताना दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले, उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं गाव फलटण मतदारसंघात आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवारी देणार आहोत. दीपक चव्हाण आपले उमेदवार आहेत. दीपक चव्हाण यांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना सहकार्य करावं, असं अजित पवार म्हणाले. दीपक चव्हाण यांना संधी दिल्यानंतर जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. कोट्यवधी रुपयांचा निधी फलटण, कोरेगाव तालुक्याला मिळेल. माझ्या बोलण्यावर माझ्या मायमाऊल्यांनी विश्वास ठेवावा. तिकडं गेल्यावर महिला, मायमाऊली राख्या बांधतात. रक्षाबंधनाची ओवाळणी दिलेली आहे. नवरात्री येणार आहे, पुढं दसरा, दिवाळी येणार आहे. त्याची भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडे जाण्याची शक्यता असून त्यांच्याकडून उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झालेलं नाही. 

इतर बातम्या : 

Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget