एक्स्प्लोर

Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली.

Manikrao Kokate and Ajit Pawar: सातत्याने वाढ ओढावून घेण्याची 'साडेसाती' मागे लागलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. अधिवेशनकाळात सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, त्याच पत्रकार परिषदेत माणिकरावांनी 'शासनाला भिकारी' म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठक झाली. ही बैठक संपल्यावर माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांपाठोपाठ बाहेर पडले. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. आजच्या बैठकीत अजित पवारांनी नेहमीप्रमाणे अभय दिले नाही, असेच संकेत कोकाटेंच्या देहबोलीवरुन मिळत होते.

एरवी माणिकराव कोकाटे हे बिनधास्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलतात. मात्र, आज अजित पवार यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे पूर्णपणे टाळले. माध्यमांना टाळत माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले. माणिकराव कोकाटे यांची ही शांतता वेगळ्याच गोष्टीचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे.  आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीनंतर अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Manikrao Kokate: मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये काय घडले?

आज माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावले. कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही दिले. 

आणखी वाचा

कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP : वाद भोवला! रुपाली ठोंबरे, अमोल मिटकरींची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha
Nashik Mahapalika : नाशिक महापालिकेत मनसे-मविआ एकत्र लढणार
Vijay Waddettiwar On Bacchu Kadu : बच्चू कडू बोलले ते काही वाईट नाही, विजय वडेट्टीवार स्पष्ट बोलले
MCA Election: एमसीए अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, पवार-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
Renuka Shahane: 'महिन्याला पगार देतो फक्त माझ्यासोबत...'; रेणुका शहणेंकडून एका विवाहित निर्मात्याचा पर्दाफाश, म्हणाल्या...
'महिन्याला पगार देतो फक्त माझ्यासोबत...'; रेणुका शहणेंकडून एका विवाहित निर्मात्याचा पर्दाफाश, म्हणाल्या...
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
Embed widget