Ajit Pawar: अजित पवार दोन दिवसांपासून गायब, हिवाळी अधिवेशनालाही गैरहजर; राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय?, चर्चांना उधाण
Ajit Pawar: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते.
Ajit Pawar: राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. नागपुरातील विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. तर आज देखील अजित पवार विधानभवनात अद्याप उपस्थित नाहीय. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही. यावरून नाराज असतानाच मात्र गायब अजित पवार आहेत. छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने अजित पवार दूर आहेत का? याची जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना झाली- छगन भुजबळ
छगन भुजबळ यांची भुजबळ फार्मवरील बैठक संपन्न झाली. कार्यकर्ते आणि समर्थकांशी भुजबळ यांनी आता बैठक घेत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. आम्ही विचार करू सर्वांच्या मनात राग आहे...निराशा आहे. मंत्रिपद कोणी नाकारले हे शोधावे लागेल. कोणी नाकारले तरी पक्ष प्रमुख निर्णय घेतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदें तसेच अजित पवार निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही अहवेलनाचा आहे. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच सर्वांशी बोलून शांतपणे निर्णय घेणार, असंही छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवारांच्या घराबाहेर ओबीसी समाजाचं आंदोलन-
बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रीपद नाकारलं त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर त्या आंदोलन करीत आहोत असं आंदोलकांचे म्हणणं आहे. तसेच लवकरात लवकर अजित पवार अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच 22 तारखेला बारामतीत अजित पवारांचा नागरि सत्कार आहे त्यावेळेस अजित पवारांना आम्ही जाब विचारू असं ओबीसी आंदोलकांचे म्हणणे आहे.
अजित पवार कशी समजूत काढणार?
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असं सांगितलं जातंय. आणखी एका बंडाच्या तयारीत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (NCP Cabinet Minister List)
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे