Aditya Thackeray : बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Aaditya Thackeray letter to Devendra Fadnavis, मुंबई : बेळगाव-कारवारला केंद्र शासित प्रदेश करण्याची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ठराव घेण्याची मागणी केली आहे.
Aaditya Thackeray letter to Devendra Fadnavis, मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. शिवाय, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय.
आदित्य ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय?
आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिलं की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात छोटेखाणी सभा पार पडणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी महाराष्ट्रातले दोन माजी मंत्री जाणार सीमा भागात जाणार आहेत. सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. या प्रस्तावानंतर 12 डिसेंबर रोजी दोन माजी मंत्री चर्चेसाठी जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात छोटेखाणी सभा पार पडणार आहे. चर्चेत सीमाभागातील तणाव कमी करण्याचा राहणार प्रयत्न असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सुनील प्रभू म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर आज आमच्या पक्षाने बहिष्कार टाकलाय. बेळगाव-कारवारमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा. राज्यपालांनी यादीच्या भाषणांमध्ये सुद्धा या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. मात्र अन्याय काय कमी झाला नाही. एकीकडे समितीला तिथे मेळावा घेण्यापासून थांबवले जाते. सरकार कोणाचे असू दे आम्ही त्या ठिकाणच्या मराठी माणसाच्या बाजूने आहे. आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत आहोत.
इतर महत्त्वाच्या बातम्या