Raj Thackeray: मनसे पदाधिकाऱ्यांचा दर 15 दिवसांनी लेखाजोखा घेणार, कामचुकार दिसला तर थेट हकालपट्टी, राज ठाकरेंचा इशारा
मी ही यंत्रणा वरपासून खालपर्यंत लावत आहे .जर मला जाणवलं हा पदाधिकारी ,कोणी का असेना....

Raj Thackeray: राज्याच्या महापालिका निवडणुकांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 19 व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आता मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा दर पंधरा दिवसांनी एकदा तपासणार असल्याचं सांगत जर कोणी कामचुकार असल्याचं दिसलं तर त्याची थेट हकालपट्टी करणार असल्याचा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलाय. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ते पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. (Pune) ही संघटनात्मक बाब आहे. याचे परिणाम निवडणूकीत दिसले पाहिजेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात कोणाला काय जबाबदाऱ्या द्यायच्या त्याचा आराखडा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
'आजकाल सगळ्या पक्षांना एकच प्रश्न पडलाय ,आमदारकीला एवढी मतं मिळाली खासदारकीला एवढे पराभव झाले . या पक्षामध्ये माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात ?आताचे राजकीय फेरीवाले आहेत आज या फुटपाथवर .तिथून डोळा मारला की त्या फुटपात वर .असे फेरीवाले आपल्याला उभे करायचं नाहीत .आपण थेट दुकान बांधू .फेरीवाले होणार नाही .संघटना मजबूत करणं गरजेचं आहे .पुढच्या दोन दिवसात माझ्यासकट सगळे प्रत्येकाचं काम काय असणार ?दर 15 दिवसात ते तपासला जाणार .मी ही यंत्रणा वरपासून खालपर्यंत लावत आहे .जर मला जाणवलं हा पदाधिकारी ,कोणी का असेना. जर मला जाणवलं तो कामचुकार आहे .तर मी त्याला पदावर ठेवणार नाही .मग त्याला ज्या फुटपाथवर जायचं आहे त्यानं जावं . असं राज ठाकरे म्हणाले .
येत्या 12 तारखेला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या त्याला देण्यात येतील .प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या टीम त्यांच्यापर्यंत येतील .ही संघटनात्मक गोष्ट आहे .या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत .त्या दृष्टिकोनातून ही संरचना केली जात आहे असेही राज ठाकरे म्हणाले .गुढीपाडव्याच्या दिवशी येत्या 30 तारखेला शिवतीर्थावर राज ठाकरे बोलणार आहेत .
कुंभमेळ्यातील स्नानावरून उडवली खिल्ली
मुंबईच्या एका बैठकीत मुंबईतील काही शाखा अध्यक्ष आणि मुंबईतील काही विभागाध्यक्ष त्या मेळाव्याला हजर झाले नाहीत .म्हणून त्यांची हजेरी घेतली .प्रत्येकाला विचारलं तर एकेक कारण दिली.त्यातील पाच-सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो .गधड्यांनो करता कशाला एवढी पापं .आल्यावर मीही विचारलं आंघोळ केलीस ना ?यावेळी सभागृहात हशा पिकला होता .कुणीतरी कमंडलूमधून पाणी आणलं . मी हट् म्हटलं .पूर्वीच्या काही ठीक होतं पण मी सोशल मीडियावर बघतोय कुंभला गेलेल्या बायका कसं कुंभ स्नान करतात . आणि हे मला कमांडल ओतून पाणी आणून देतात .कोण पिल ते पाणी .आत्ताच कोरोना गेलाय . दोन वर्ष तोंडला फडकी बांधून फिरलो .आता तिथे जाऊन जाऊन आंघोळ करतात .असे म्हणत राज ठाकरेंनी कुंभ स्नानाची खिल्ली उडवली .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
