एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे, राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावं वाचून दाखवली!

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Vidhan Sabha session) आजपासून सुरुवात झाली आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा विरुद्ध ओबीसी वाद, (Maratha vs OBC) पोर्शे अपघात प्रकरण, घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना अशा अनेक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे. तिकडे पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 
 
दरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह 8 आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला. 

राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती

  • राजू पारवे - उमरेड विधानसभा (राजीनामा - 24 मार्च)
  • निलेश लंके - पारनेर विधानसभा  (राजीनामा - १० एप्रिल)
  • प्रणिती शिंदे - सोलापूर शहर मध्य विधानसभा  
  • बळवंत वानखेडे - दर्यापूर विधानसभा
  • प्रतिभा धानोरकर - वरोरा विधानसभा (१३ जून)
  • संदीपान भुमरे - पैठण विधानसभा (१४ जून)
  • रविंद्र वायकर - जोगेश्वरी पूर्व विधानसभा 
  • वर्षा गायकवाड - धारावी विधानसभा

लोकसभेवर निवड  

महाराष्ट्रातील 7 आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. विधानसभेचे 13 आणि विधानपरिषदेचे 2 असे 15 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यापैकी 7 आमदारांचा विजय झाला तर 8 आमदार पराभूत झाले. 

 कोणत्या आमदारांचा लोकसभेला पराभव?

 1. सुधीर मुनगंटीवार (भाजप) - चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पराभव

2. राम सातपुते (भाजप) - सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव

3. मिहिर कोटेचा (भाजप) - ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभव

4. यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) -  दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभव

5. विकास ठाकरे (काँग्रेस) - नागपूर लोकसभा निवडणुकीत पराभव

6. रवींद्र धंगेकर (काँग्रेस) - कसबा लोकसभा निवडणुकीत पराभव

7. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - सातार लोकसभा निवडणुकीत पराभव

8. महादेव जानकर (रासप) - परभणी लोकसभा निवडणुकीत पराभव

संबंधित बातम्या 

Lok Sabha Election Result : कुणी केंद्रातील आणि कुणी राज्यातील मंत्र्याचा पराभव केला, महाराष्ट्रातले सात आमदार बनले खासदार, दिल्ली गाजवण्याची संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP MajhaSachin kharat On Deekshabhoomi :  दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं : सचिन खरातAmbadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोयKolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Embed widget