मोठी बातमी : गुलाबराव ते उदय सामंत, केसरकर ते दादा भुसे, एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या, ठाकरे गटाचा मोठा पत्ता
ठाकरे गटाने मोठा पत्ता टाकला शिंदे गटाच्या अडचणी वाढणार? एकनाथ शिंदेंना हटवण्याचं ठरलं, त्यावर शिंदे गटातील 23 आमदारांच्या सह्या
MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) सुरू असून आज दोन सत्रांत सुनावणी पार पाडणार आहे. पहिल्या सत्रातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची साक्ष घेतली. त्यावेळी ठाकरे गटाकडून मोठा पत्ता सादर केला गेला. दिलीप लांडेंच्या उलट तपासणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकीलांनी एक अटेंडंटशिट सादर केली. ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंटशिटवर, शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत. महत्त्वची बाब म्हणजे, या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं होतं.
21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते? उलट तपासणी दरम्यान वारंवार येणाऱ्या प्रश्नावर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या साक्षीदाराला आज 21 जून 2022 च्या बैठकीची अटेंडन्स शीट दाखवली आहे. ही अटेंडन्ट शीट ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आली होती.
ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या या अटेंडंटशिटनुसार, सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी करून 21 जून च्या बैठकीसाठी हजर राहण्याचे सूचना होत्या. या 21 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीत एकूण 23 आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती आणि त्यांच्या अटेंडन्स शीटवरील सह्या या संबंधित शिवसेना शिंदे गटात गेलेल्या आमदारांनीच केल्या होत्या का? असा सवाल शीट दाखवून ठाकरे गटाकडून विचारला जाणार आहे.
एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या
या बैठकीत सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे सर्व आमदार उपस्थित होते, अशा प्रकारच्या सह्या या अटेंडंटस शीटवर आहेत. याच बैठकीमध्ये आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना गटनेचे पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाची वकील उलट तपासणी मध्ये प्रश्न उपप्रश्न विचारून अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
दिलीप लांडे यांनी आपल्या साक्षीमध्ये यावर केलेली सही आपलीच असल्याचं कबूल केला आहे, पण त्यामध्ये वरती लिहिण्यात आलेल्या पक्षादेश क्रमांक हा आमच्या सह्या घेतल्यानंतर घेण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :