(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'2024 च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, ते देशाचे पुढचे पंतप्रधान असतील', भाजपच्या मोठ्या नेत्याची घोषणा
Tata Tiago NRG XT: स्वदेशी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने देशात नवीन Tiago NRG XT व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कारच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार Tiago चे XT व्हेरिएंट अपडेट करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही कार लॉन्च केली आहे.
Lok Sabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी बिहारमधील कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही बिहारमध्ये 2024 आणि 2025 मध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पाटणा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या दोन दिवसीय संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप सत्राला संबोधित केले. अमित शहा म्हणाले की, देशात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले पाहिजे. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजप कार्यालय हे संस्कार देण्याचे केंद्र असल्याचे सांगितले. एकत्र काम कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी येथे या, असं ही ते म्हणाले आहेत. आगामी काळात भाजप हा एकमेव पक्ष राहील, इतर सर्व राजकीय पक्ष उद्ध्वस्त होतील, असे ते म्हणाले.
'भाजपच्या बरोबरीने येण्यासाठी 40 वर्षे लागतील'
जेपी नड्डा म्हणाले की, इतर कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न करावेत, त्यांना आमच्या बरोबरीने येण्यासाठी 40 वर्षे लागतील. ते म्हणाले की, भाजपविरोधात लढण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नाही. आमचा लढा घराणेशाही असलेल्या पक्षांशी असल्याचे ते म्हणाले. काश्मीरमध्ये पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, याशिवाय हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आम्ही घराणेशाही असलेल्या पक्षांशी लढत आहोत. घराणेशाहीविरोधातील लढाई हे भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असं ते म्हणाले आहेत.
पाटणा विद्यापीठात नड्डा गो बॅकच्या घोषणा दिल्या
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पाटणा येथे पोहोचताच पाटणा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) आणि जन अधिकार पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी 'जेपी नड्डा गो बॅक'च्या घोषणा दिल्या. जेपी नड्डा यांनी पाटणा हायकोर्ट ते जेपी गोलंबरपर्यंत रोड शो केला. रोड शो संपल्यानंतर नड्डा पाटणा विद्यापीठात गेले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी निदर्शने करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि काळे झेंडे दाखवले.