Pfizer आणि मॉडर्ना लसींपैकी कोणती लस भारतासाठी जास्त फायदेशीर?
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
![Pfizer आणि मॉडर्ना लसींपैकी कोणती लस भारतासाठी जास्त फायदेशीर? pfizer and moderna which corona vaccine better for India Pfizer आणि मॉडर्ना लसींपैकी कोणती लस भारतासाठी जास्त फायदेशीर?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18222257/Corona-VAccine.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरचा अभ्यास करणार्या स्वतंत्र पॅनेलने सांगितले की कोविड 19 रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. असाच एक अभ्यास मॉडेर्नावर घेण्यात आला आणि त्यात ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे आढळले.
यूएस फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) बेंचमार्क अंतर्गत मंजुरीसाठी 50 टक्के प्रभावी असणे आवश्यक आहे. म्हणून दोन्ही लसींना नियामक मंजुरी मिळणे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आतापर्यंत चाचणीदरम्यान सुरक्षिततेबद्दल कोणतीही अडचण उद्भवलेली नाही आणि दोन्ही कंपन्यांकडून आपत्कालीन मंजुरीची मागणी केली जईल. अमेरिकेने दोन्ही कंपन्यांना 10 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. तर कॅनडा, ब्रिटन आणि जपान व्यतिरिक्त युरोपियन युनियनला 30 कोटी लस पुरवण्याचे फायजरने मान्य केले आहे.
दोन्हीपैकी कोणती लस भारतासाठी चांगली?
फायझर लस
फायझर लसीचं स्टोरेज करणं ही भारतात सर्वात मोठी अडचण ठरू शकते. फायझर लस -70 डिग्री तापमानात साठवावी लागते आणि वाहतूक करावी लागेल. याव्यतिरिक्त 5 दिवस फ्रिजमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच तीन आठवड्यांच्या आत या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.
मोडर्ना लस
मॉडर्ना लस भारतासाठी योग्य म्हणता येईल. या लसीला स्टोरेज आणि वाहतुकीसाठी -20 डिग्री तपमान आवश्यक आहे. तर 30 दिवसांपर्यंत ही लस रेफ्रिजरेटर तापमानात ठेवली जाऊ शकते. 12 तास ही लस घरातील तपमानावर देखील ठेवली जाऊ शकते. तर या लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांच्या फरकांनी घ्यावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)