Vijay Wakode : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे निधन, आंदोलनात सहभागी असतानाच ह्रदयविकाराच्या झटक्याने गाठलं
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे.
Vijay Wakode, परभणी : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. श्वास घेता येत नसल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. परभणीतील डॉ रसाळ यांच्या रुग्णालयात प्राणज्योत मालवली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात आज दिवसभर सहभागी होते. सोमनाथ सुर्यवंशी यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला. आंबेडकरी आंदोलनाचे नेते विजय वाकोडे यांच्यावर उद्या दुपारी ४ वाजता परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी वाहिली आदरांजली
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे असे जाणे धक्कादायक आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी आज परभणीत झाला. आज अंत्यविधीत ते माझ्यासोबत होते. चळवळीतील एक लढाऊ व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. विजय वाकोडे यांना वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवाराकडून विनम्र आदरांजली!
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पुकारण्यात आलेल्या आंदोलनात विजय वाकोडे यांचा सहभाग
परभणीत बुधवारी (दि.11 पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका युवकाचा न्यायालयीन कोठडीत असताना रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहरातील बहुतांश भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, त्यानंतर पुकारण्यात आलेल्या आंदोलनात विजय वाकोडे सामील झाले होते.
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकारhttps://t.co/8Fe4wBbNt1
— ABP माझा (@abpmajhatv) December 16, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या