Sushma Andhare on Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांची तुलना फक्त राखी सावंतशीच होऊ शकते; मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांवर निशाणा
Sushma Andhare on Amruta Fadnavis: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांची तुलना अभिनेत्री राखी सावंतशी केलीेये.
Sushma Andhare on Amruta Fadnavis: ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) फायरब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अभिनेत्री राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी केली आहे. दोघीही गायन, मॉडलिंग क्षेत्राशी निगडित आहेत आणि दोघींचीही प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे. परभणीतल्या (Parbhani) महाप्रबोधन यात्रेदरम्यान (Mahaprabodhan Yatra) बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली. राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच भाजपचे अनेकजण माझ्यावर कुठल्याही स्तराला जाऊन हल्ला करत आहेत. माझ्या स्त्रीपणावर घाला घातला जातोय, पण मी चळवळीचं शास्त्र शिकून आली आहे. मी हार मानणार नाही. मी बाईपणाचं कोणतही विक्टिम कार्ड खेळणार नाही. मी लढेन आणि होय मी जिंकेन आणि मीच जिंकेन, खात्रीनं जिंकेन. मला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न हे सर्वजण करतात, तो प्रयत्न मी सक्सेस होऊ देणार नाही."
राखी सावंतची तुलना तिच्या क्षेत्रानुसार अमृता वहिनींसोबत : सुषमा अंधारे
मोहित कंबोज यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, "माध्यमांचे प्रतिनिधी मला मोहित कंबोज यांच्या टीकेवर प्रतिक्रिया का देत नाही? असा प्रश्न सातत्यानं विचारत होते. पण कंबोजचं इन्टेनशन हीज इंटेन्शन वॉज नॉट गुड... त्याचं इंटेन्शन जर चांगलं असतं तर त्यानं राखी सावंतची तुलना आणखी कोणाशीतरी केली असती. कारण बिचारी राखी सावंत जी आहे तिचं क्षेत्र गायन, मॉडलिंग, डान्सिंग... काय तिचा मेकओव्हर, काय तिचा तो लूक...फोटोशूट अन् काय-काय भानगडी असतात, आम्ही आमच्या आयुष्यात फोटोशूट कधी केलं? दहावी आणि बारावीच्या हॉलतिकिटासाठी फोटो काढताना. यापलिकडे आम्हाला फोटोचं काही माहीतच नाही. जर त्या बिचाऱ्या माऊलीची तुलना होऊ शकत असेल, तर तिच्या क्षेत्रानुसार तुलना ही आमच्या अमृता वहिनींसोबत होईल."
पाहा व्हिडीओ : Sushma Andhare : अमृता फडणवीसांची तुलना राखी सावंतसह, सर्जरीचा उल्लेख करत टोलेबाजी