एक्स्प्लोर

Parbhani : परभणीत मिरवणुकीतील डीजेमुळे एकाचा ह्रदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

Parbhani : मिरवणुकीतील डीजेमुळे परभणीतही एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Parbhani : राज्यात गणेश विसर्जन उत्साहात सुरू असताना परभणीत मात्र डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. दोघांना प्रकृती गंभीर झाल्याने जिंतुरहून परभणीला हलवण्यात आले आहे. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी हा प्रकार घडलाय. 

दोघांची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी परभणीला हलवले 

अधिकची माहिती अशी की, श्री राजा शिवछत्रपती गणेश मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आली होती. त्यावेळी जोरदार सुरू असलेल्या डीजेमुळे संदीप कदम यांच्या मृत्यू झाला.  तर  शिवाजी कदम आणि शुभम कदम हे 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवरही जिंतुर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना परभणीकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले  आहे.  सध्या जिंतुर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तरुण जमले आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या घटनेनंतर सुरु असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोचला असून परभणीतही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सजीव देखावे सादर केले आहेत, तर राजे संभाजी मित्र मंडळाने आदिवासी नृत्याचा देखावा केलाय. दुसरीकडे मानाचा मोठा मारुती संस्थानच्या ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. त्या पाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुका सुरु आहेत. बालाजी गणेश मंडळाने राजस्थानच्या खातून बाबांचा देखावा परभणीकरांसमोर आणलाय तर सिंधी गणेश मंडळांने ही बैलगाडीत गणरायाची मिरवणूक काढलीय. या सर्व मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात शिवाजी चौकात या मिरवणुकांचा समारोप होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
Ajit Pawar : छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, अधिवेशनला हजर राहणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझाUday Samant Nagpur:छगन भुजबळांबाबत अजितदादा निर्णय घेणार, शिवसेनेच्या नाराज आमदारांबाबत काय म्हणाले?Chhagan Bhujbal Nashik :भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार, तटकरेंचं अजूनही मौनABP Majha Headlines :  9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
Ajit Pawar : छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, अधिवेशनला हजर राहणार?
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Embed widget