Parbhani News : परभणीतील तरुण उद्योजकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर कोर्टवरच हार्ट अटॅक
Parbhani News : परभणीतील तरुण उद्योजकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूबॅडमिंटन खेळून बसल्यानंतर कोर्टवरच आला झटका सचिन तापडिया यांच्या मृत्यूने परभणी शहरासह जिल्ह्यात हळहळदृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Parbhani News : तरुणपणात हृदय विकाराचा झटका येण्याच्या घटना मागच्या काही वर्षात वाढल्या आहेत. परभणीतील (Parbhani) तरुण उद्योजक असलेल्या 44 वर्षीय सचिन तापडिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) झाला. परभणी शहरातील बॅडमिंटन कोर्टवर काल (25 ऑगस्ट) सकाळी बॅडमिंटनचा (Badminton) एक राऊंड खेळल्यानंतर ते याच ठिकाणी बसले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. याच झटक्यात त्यांचा मृत्यू झाला. ही सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.
परभणी शहरातील तापडिया ऑटो कन्सल्टन्सीचे मालक सचिन तापडिया हे काल सकाळी बॅडमिंटन कोर्टवर नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळले. त्यांचा एक राऊंड झाला आणि ते तिथेच कोर्टवर असलेल्या खुर्चीत बसले. मात्र त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना उचललं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सचिन तापडिया हे एक उमदे व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येकाला आपलंसं करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या या अशा पद्धतीने जाण्याने परभणी शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याआधी क्रिकेटच्या मैदानावर खेळताना चक्कर येऊन किंवा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसंच जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याचे प्रकारही समोर आले होते. दोन आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना राजू कोसळले. तिथे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं अजून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू
तर नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळताना एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रिकेट क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सुरेश करवा या ज्येष्ठ खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
पुण्यात क्रिकेट खेळताना 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
याशिवाय जून महिन्यात पुण्यातही क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. श्रीतेज सचिन घुले असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. हडपसर परिसरातील हांडेवाडी इथल्या मैदानावर ही घटना घडली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल; जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका
Nashik News : दुर्दैवी! नाशिकमध्ये बॅटिग करताना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, खेळाडूचा मृत्यू