Parbhani Band : परभणीत नेमकं काय घडलं? संचारबंदी लागण्याची शक्यता! काय सुरु, काय बंद?
Parbhani Violance : परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. सोबतच आता SRPF च्या तुकडीला ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
Parbhani Bandh परभणी : परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळून लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Police) ॲक्शन घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. परीसारत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचही आवाहन केलं आहे.
संचारबंदी लागण्याची शक्यता
तर दुसरीकडे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप परभणीत दाखल होताच पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. आशातच परभणीत संचारबंदी लागण्याची ही शक्यता आहे. परभणी पोलिसांनी तसा जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान काही वेळेत संचारबंदीचे आदेश लागू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोबत आता SRPF च्या तुकडीला ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार परभणी शहर व जिल्हयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध असेल.
तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येईल
हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
हे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी दुपारीचे 13.00 वाजे पासून पुढील आदेशा पावेतो लागु राहतील.
परभणीत आता पर्यंत नेमकं काय-काय घडलं?
५ ते ५.३० च्या सुमारास एका माथेफिरू ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची काचे फोडून तोडफोड करत विटंबना केली
यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ या माथेफिरू व्यक्तीला पकडले आणि चांगलाच चोप दिला
यानंतर तत्काळ पोलीस तिथ दाखल झाले पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले
घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आंबेडकरी अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले
एकत्र आल्यानंतर पुतळ्यासमोरच रस्ता रोको करण्यात आला काही गाड्यांवर दगडफेक केली
जमावाचे एक टोळके रेल्वे स्थानकात गेले आणि
नंदीग्राम एकप्रेस या आंदोलकानी रोकली
अर्धा तास रेल्वे रोको केल्यानंतर पोलिसांनी समजावून आंदोलकांना रेल्वे स्थानकाबाहेर काढले
रात्री उशिरा पर्यंत शहरातील खानापूर फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिंतूर रोड पाथरी रोड गंगाखेड रोड वर लोकांनी ठिय्या आंदोलन केले होते
रात्रीच सर्व आंबेडकरी जनतेकडून परभणी बंदचे आवाहन करण्यात आले
आज सकाळपासून शहरात बंद पाळण्यात आला शहरातील तसेच जिल्हाभरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती शाळा महाविद्यालये ही बंद होती
आंबेडकरी अनयायांनी आजही खानापूर फाटा, विद्यापीठ गेट, वसंतराव नाईक यांचा पुतळा तसेच डॉ बाबासाहेब आबेडकर यांचा पुतळा परिसर ठिय्या आंदोलन केले
वेगवेगळ्या ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले
दुपारी बारा साडेबारा ते एक दरम्यान सर्व आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक तरुणांचा एक जमाव आला
हातात काठ्या घेवून दगड घेवून या जमावाने पहिल्यांदा बंद दुकानावर हल्ला चढवला
बंद दुकानाचा शटरवर काठ्या घातल्या दगडफेक केली विसावा कॉर्नर वरून हा जमाव तसंच पुढे नारायण चाळ आर आर टॉवर परिसरात पोचल तिथेही दगडफेक केली तोडफोड केली
पोलिसांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली
यानंतर पोलिसांनी ही आंदोलकांवर लाठीचार्ज केला
पुन्हा या टोळक्याने विसावा कॉर्नर परिसरात दुकानांच्या बाहेरील साहित्याची तोडफोड करत साहित्य पेटवले
पोलिसावर पुन्हा दगडफेक करण्यात आली पोलिसांनी अश्रुधुराच्या नालकंड्या फोडल्या लावण्यात आलेली आग विझवण्यात आली
पोलिसांनी परिस्थिती हाताळत शांत केली
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आंदोलक यांच्याशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वांना बोलून शांततेचं आवाहन केले
सर्वांनी मान्य केले आणि हे सर्व जण बाहेर पडले
जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश काढले
बैठक संपताच महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला .
जिल्हाधिकारी दालनात असताना महिलांनी सर्व कार्यालयात तोडफोड केली
अर्धा तास हे सर्व सुरू होते नंतर पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले
हे ही वाचा