फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, मंत्री पंकजा मुंडेंची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार
Pankaja Munde on Phaltan Doctor Case : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सांत्वन पर भेट घेतली.

Phaltan Doctor Case सातारा : फलटण (Phaltan) येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील (Phaltan Doctor Case) पीडित कुटुंबाची मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सांत्वन पर भेट घेतली. पंकजा मुंडे यांना पाहताच मृत डॉक्टरच्या आईला आश्रु अनावर झाले. या प्रकरणाची सखोल माहिती घेतली असून उच्चस्तरीय चौकशी होईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी पीडित कुटुंबाला दिले. दोन दिवसांपूर्वी बीडच्या वडवणी तालुक्यातील एका गावातल्या महिला डॉक्टरने फलटण येथे आत्महत्या (Phaltan Crime Doctor Death) केली होती. आणि याच कुटुंबाची मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतलीय. मृत डॉक्टर निर्भीड होती काही चुकीच्या गोष्टीच्या तिने तक्रारी केल्या. अशा मुलीवर ही वेळ का आली असावी याला कोण जबाबदार याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Pankaja Munde : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी लावावी तसेच निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही पंकजा मुंडेंनी यावेळी दिली. पंकजा मुंडेंनी डॉ संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची मूळ गावी जाऊन भेट घेतली. संपदाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Gopal Badane : निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिसांना शरण
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात (Doctor Suicide Case) मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badane) पोलिसांना शरण आला आहे. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'पोलीस निरीक्षक बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला' असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर गोपाळ बदने फरार होता आणि सातारा पोलीस (Satara Police) त्याच्या शोधात होते. पुणे, पंढरपूरसह अनेक ठिकाणी पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती, मात्र तो सापडत नव्हता. अखेर, तो स्वतः फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला, जिथे त्याच्यावर बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
हेहि वाचा
























