Crime News : डॉक्टर..डॉक्टर खेळू सांगत 12 वर्षाच्या मुलीवर 18 वर्षीय मुलाचा अत्याचार
Crime News : डॉक्टर..डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
![Crime News : डॉक्टर..डॉक्टर खेळू सांगत 12 वर्षाच्या मुलीवर 18 वर्षीय मुलाचा अत्याचार Virar Crime News 17 years old boy booked for rape on minor 12 years old girl with Virar palghar Maharashtra Crime News : डॉक्टर..डॉक्टर खेळू सांगत 12 वर्षाच्या मुलीवर 18 वर्षीय मुलाचा अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/14/46d75089f685187031cf45ea5a775c0b1694706642610290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विरार : डॉक्टर...डॉक्टर खेळू असे सांगून एका 18 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय मुलीवर अत्याचार (Rape On Minor) केला असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचारात आरोपीला एका 15 वर्षीय मुलीने मदत केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे विरारमध्ये (Virar News) खळबळ उडाली आहे. आरोपीने आपले वय प्रथम 17 वर्ष सांगितले होते. मात्र पोलिसांनी त्याची कागदपत्रे तपासल्यानंतर तो 18 वर्षाचा असल्याचा समोर आलं आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे. तर, या अत्याचारात त्याला साथ देणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा शोध पोलीस घेत आहेत.
मुली, महिलांवर अत्याचारात वाढ होत असताना आता पुन्हा एकदा जवळच्या, ओळखीच्या लोकांकडून अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे दोन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खेळण्या बागडण्याच्या वयात मुलं कोणत्या थराला जात आहेत, यावरून आता पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
खेळण्याच्या बहाण्याने अत्याचार
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षाच्या मुलीने 12 वर्षाच्या पीडित मुलीला आपल्या घरी बोलावत असे. आपल्याला डॉक्टर डॉक्टर खेळायचे आहे, सांगत असे. या खेळण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या बेडरूम मध्ये नेऊन, झोपण्यास सांगितले. त्यानंतर 18 वर्षाच्या आरोपीला रुम मध्ये बोलावून जबरदस्तीने दार लावून ती निघून गेली. त्या बेडरुममध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. ही गोष्ट कुणाला सांगितले तर पीडित मुलीच्या लहान बहिणी सोबत ही असाच प्रकार करण्यात येईल अशी धमकी ही देण्यात आली.
गरोदर राहिल्याने अत्याचाराची घटना उघड
या अत्याचारामुळे आणि धमकीमुळे पीडित मुलीने कोणतीही वाच्यता केली नाही. पण, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही अत्याचाराची बाब समोर आली. पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेत माहिती घेतली. त्यानंतर ही बाब उघड झाली. बुधवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या विरार पोलीस या सर्व प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
पहाटे झोपेत असलेल्या गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या
रोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडले. एकनाथ जायभाये असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील बिकानेरमध्ये सध्या तो नियुक्त आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)