(Source: ECI/ABP News/ABP Majha)
14 महिने उलटूनही सदिच्छा अद्याप बेपत्ताच, पोलिसांचा शोध सुरूच, आतापर्यंत दोन जण अटकेत
Palghar Crime News : पालघरच्या (Palghar) सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोन जणांना अटक. पण सदिच्छा अद्याप बेपत्ताच...
Palghar Crime News : पालघरमधील (Palghar News) बोईसर (Boisar News) येथे राहणारी आणि मुंबईतील (Mumbai News) सर जे. जे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या सदिच्छा साने ही विद्यार्थीनी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. या विद्यार्थीनीच्या अचानक बेपत्ता होण्याच्या प्रकरणात अखेर 14 महीन्यांनी मुंबई पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शुक्रवारी वांद्रे बॅंड स्टँड येथे जीवरक्षक असणारा मिथ्थू सिंह याला अटक केल्यानंतर शनिवारी या प्रकरणातील दुसरा आरोपी जब्बार याला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण दोघांना अटक करण्यात आली आहे.
जीवरक्षक मिथू सिंहला काही दिवसांपूर्वीच अटक
वांद्रे येथे सदिच्छा साने हिची त्या जीवरक्षकाबरोबर शेवटची भेट झाली होती. मात्र या प्रकरणी अजूनही सबळ पुरावे पोलिसांना मिळाले नसल्याची माहिती एबीपी माझाला बोईसर पोलिसांनी दिली होती. परंतु, सदिच्छा साने जीवरक्षकाला शेवटी भेटली आणि तिथेच तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. यामुळे या जीवरक्षकाला वांद्रे पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे दोन वर्षानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिथ्थू सिंह याला अटक केली आहे. बॅन्ड स्टॅन्ड इथे सिंह यानेच तिला शेवटचे पाहिले होते.
प्रकरण नेमकं काय?
दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती पुन्हा घरी परतलीच नाही. घरच्यांनी शक्य तिकडे सदिच्छाचा शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाणं गाठलं. कुटुंबियांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह वांद्रे बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघरमध्येही याप्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.
जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्यानं या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरुन तिचं शेवटचं लोकेशन वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड दिसत होतं. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. गुन्हे शाखा युनिट 9 नं याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथ्थू सिंहनं पाहिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :