एक्स्प्लोर

Palghar News : पालघर -डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग बारगळणार? आता उमरोली-इगतपुरी रेल्वेमार्गाचा प्रस्ताव

Dahanu Nashik Railway : डहाणू-नाशिक हा प्रस्तावित रेल्वे मार्ग बारगळण्याची चिन्हं असून त्याऐवजी उमरोळी-इगतपुरी हा मार्ग सुरू होण्याची हालचाल सुरू झाली आहे.

Palghar News : पालघर जिल्ह्यातील (Palghar News) दुर्गम आदिवासी भागाच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे मागणी होत असलेल्या डहाणू-जव्हार-नाशिक (Dahanu Nashik Railway) रेल्वेमार्गा ऐवजी आता उमरोली-विक्रमगड-जव्हार-इगतपुरी (Umaroli Igatpuri via Jawhar) हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्याचा विचार पुढे आला आहे. खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू,जव्हार,मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हा दुर्गम आदीवासी भाग थेट रेल्वेने जोडण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी सुद्धा या रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षे प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचासुद्धा या रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. मात्र डहाणू-नाशिक दरम्यानच्या या मार्गात धामणी धरण, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर या दुर्गम तालुक्यातील लहान-मोठ्या डोंगर-टेकड्या, घाट, नद्या आणि उंच सखल भाग यामुळे हा 167 किमीचा मार्ग बनविण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेमध्ये स्पष्ट झाले होते. त्याऐवजी उमरोली-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा ते इगतपुरी हा 95 किमी अंतराचा आणि कमी खर्चात बनणारा रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे प्रस्तावित करण्यात आल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले.

नवीन रेल्वे मार्ग किती फायदेशीर?

उमरोळी ते इगतपुरी प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग हा पालघर जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारा असल्याने डहाणू ते वसई आणि जव्हार ते वाडा या पालघर जिल्ह्यातील संपूर्ण भागाला सोयीस्कर ठरणार आहे. त्याचप्रमाणे जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड हा पर्यटनदृष्ट्या अतिशय समृद्ध परंतु आधुनिक दळण वळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे दुर्गम असलेल्या या  भागातील नागरीकांना पालघर जिल्हा मुख्यालयात कमीत कमी वेळेत पोचणे शक्य होणार आहे.

नवीन रेल्वेमार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळून नवीन उद्योगधंदे सुरू होऊन स्थलातराचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याचप्रमाणे तारापूर सारखी मोठी औद्योगिक वसाहत, बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग हे प्रकल्प एकमेकांशी जोडण्यास मदत होणार आहे. या प्रस्तावित नविन रेल्वेमार्गाचे लवकर सर्वेक्षण व्हावे अशी मागणी खासदार राजेंद्र गावीत यांच्यावतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Embed widget