Palghar : पालघरमधील आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागन, उपचारानंतर प्रकृती स्थिर
Palghar : पालघरमधील गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची (swine flu) बाधा झाली आहे.
![Palghar : पालघरमधील आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागन, उपचारानंतर प्रकृती स्थिर 15 students of Ashram School of Palghar infected with swine flu Palghar : पालघरमधील आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागन, उपचारानंतर प्रकृती स्थिर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/19/eefb6d1ae669a9f6ee1a35a2819301501658251912_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : जिल्ह्यातील गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची (swine flu) बाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वसतीगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे. यापूर्वी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाला होता.
गिरगाव आश्रम शाळेतील मुलामुलींच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांची आजारी असल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 मुली आणि एक मुलगा अशा 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीअंती समोर आले आहे. तर तीन विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित विद्यार्थी व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले होते. सध्या स्वाईन फ्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांची उपचारानंतर प्रकृती स्थिर असून खबरदारी म्हणून त्यांना वसतीगृहातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.
झाई आश्रमशाळेतील सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू
झाई आश्रम शाळेत सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर गव्हर्मेंट इंडियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या डेव्हलपमेंट ऑफ सेंट्रल मल्टी डिसिप्लिनरी टीमने या आश्रम शाळेत आरोग्य तपासणी केली. त्यात झाई आश्रम शाळेतील आणखी सात विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाई आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या मर्जीतील तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये, आमदार गणेश नाईक यांचा शिंदे यांना दे धक्का
Sanjay Raut : संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)