एक्स्प्लोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या मर्जीतील तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये, आमदार गणेश नाईक यांचा शिंदे यांना दे धक्का

नवी मुंबईत भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे यांच्या मर्जीतील तीन माजी नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Ganesh Naik Shocks Eknath Shinde : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट एकत्र आले असले तरी स्थानिक पातळींवर सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभरापूर्वी भाजपाचे असलेले तीन नगरसेवक (Corporator) नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता परत एकदा घरवापसी करत या तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेला अनेक धक्के बसले आहेत. आमदारांपाठोपाठ अनेक ठिकाणचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता तर शिवसेनेचे बहुतांश खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. परंतु याच वेळी शिंदे यांच्या मर्जीतील शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवक घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला.

ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांच्या उपस्थितीत या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिघा विभागात प्राबल्य असलेले गवते परिवार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवक होते. गणेश नाईक यांनी या तीन नगरसेवकांना भाजपात घेत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आल्यानंतर ही पहिलीच घटना आहे. सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेला गोंधळही यासाठी कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. शिवसेनेच्या 40 आणि दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेरीस पद सोडावं लागलं. यानंतर आठ दिवसांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचे देवेंद्र फडणवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Maharashtra live blog updates: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Maharashtra LIVE: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Embed widget