एक्स्प्लोर

Shrinivas Vanaga: श्रीनिवास वनगा तब्बल 4 दिवसानंतर घरी परतले; म्हणाले, एकनाथ शिंदे विश्वासू, पण त्या लोकांना सोडणार नाही!

Palghar Shrinivas Vanaga: चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Palghar Shrinivas Vanaga: नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanaga) तब्बल चार दिवसानंतर घरी परतले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील चार दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. 

घरी पुन्हा आल्यानंतर श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanaga) यांच्या चेहऱ्यावर नाराजी, राग, दुःख दिसून येत आहे. चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. षडयंत्र करून माझं तिकीट कापलं गेलं. पद असलं नसलं तरी, मी काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण त्यांच्या जवळची लोकं त्यांना मिस गाईड करतात, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली. 

श्रीनिवास वनगा नेमकं काय म्हणाले?

100 तासांपेक्षा अधिक वेळ नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा आज आपल्या घरी परतले असून ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार, असंही ते म्हणाले. शेवटपर्यंत मला आश्वासन देण्यात आली. मात्र माझं तिकीट रद्द करून उमेदवारी आयात उमेदवाराला दिली. मात्र माझी काय चूक होती?, मी लोकांची काम सातत्याने करत आहे. तरीही माझ्यावर हा अन्याय केला गेला, हे पूर्ण षडयंत्र होतं. माझं शंभूराजे देसाई यांच्याबरोबर बोलणंही झाला आहे तेही प्रामाणिक आहेत. प्रामाणिकपणाचे फळ असं मिळतं का?, असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी उपस्तित केला. 

षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही- श्रीनिवास वनगा

मी जिद्दी आहे, प्रामाणिक आहे आणि पुढे माझ्या सामाजिक कामातून हे मी या षडयंत्र रचणाऱ्यांना दाखवून देईल. मी त्यांना सोडणार नाही. माझं काम मी कायमस्वरूपी करत राहील. मला भविष्य आहे. मी भावनेच्या भरात काही बोललो गेलो असेल. मला बरंही वाटत नव्हतं आणि माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळलं. परंतु माझा मुलगा आजारी होता असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे शेवटी आज मी घरी आलो. माझा परिवार आहे त्यांचीही मला काळजी आहे. परंतु अशा प्रामाणिक लोकांवर अन्याय होऊ नये असं मला वाटतं. असं मत श्रीनिवास वनगा यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले.

मी या षडयंत्र रचणाऱ्यांना दाखवून देणार-श्रीनिवास वनगा:Video

संबंधित बातमी:

Srinivas Vanaga: बंडावेळी नाचले, तिकीट कापताच ढसाढसा रडले; शिंदे गटातील श्रीनिवास वनगा आहे तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : 31 OCT 2024Ravi Raja on Vidhan Sabha | काँग्रेसच्या दोन नेत्यांचा शिवसेना, भाजपात प्रवेश Special ReportManoj Jarange | मनोज जरांगेंचे उमेदवार मविआची डोकेदुखी वाढवणार? Special ReportZero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Embed widget