एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पाकव्याप्त काश्मीरमधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, नरेंद्र मोदी...

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएने तयार केला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) प्राथमिक तपास अहवाल एनआयएने तयार केला आहे. एनआयएच्या तपास अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या कटाचे पुरावे सापडले आहेत. बेताब खोऱ्यात दहशतवाद्यांनी त्यांचे शस्त्रे लपवल्याचे तपासात उघड झाले. दहशतवादी हल्ल्यात OGW च्या भूमिकेचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. एनआयएने ओव्हरग्राउंड कामगारांच्या संपर्कांची यादी तयार केली. ओजीडब्ल्यू विरुद्ध प्रशासकीय आणि न्यायालयीन कारवाईची तयारी सुरू आहे.

प्राथमिक तपास अहवालात हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांचा उल्लेख आहे. हाश्मी मुसा आणि अली भाई उर्फ ​​तल्हा भाई या नावाचा समावेश आहे. हाश्मी मुसा आणि तल्हा भाई हे पाकिस्तानचे नागरिक आहेत, दहशतवादी पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. पाकिस्तानकडून मार्गदर्शक सूचना मिळत होती. आयएसआयच्या आदेशावरून लष्करच्या मुख्यालयात पहलगाम हल्ल्याबाबत कट रचण्यात आला होता. त्यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताकडून अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी-

पाकिस्तान कसा घाबरला आहे याचे पाच पुरावे काल एबीपी माझानं प्रेक्षकांना दाखवले आणि त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. बिथरलेल्या पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी दिली आहे. नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय, असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या धार्मिक विभागाचे प्रमुख हाफिज नजीर अहमद यांनी दिलं आहे. 

हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरली-

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर एबीपी 'माझा'च्या हाती लागला आहे. या एफआयआरमध्ये हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु झालेला हल्ला 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत सुरु होता. हल्ल्यानंतर 10 मिनिटांत म्हणजे दुपारी अडीच वाजता एफआयआर दाखल झाला. दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडून सूचना मिळत होत्या, असंही एफआयआरमध्ये म्हटलंय. हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती, VIDEO:

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

Pahalgam Terror Attack: नि. मेजर जनरलचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget