एक्स्प्लोर

Maratha Reservation : जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा, उस्मनाबादमध्ये शेतकऱ्याने थेट आंदोलनस्थळावर काढली गाईची धार

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. पण उस्मानाबादमधील कसबे तडावळेमध्ये एक वेगळचं चित्र आंदोलनाच्या दरम्यान पाहायला मिळालं.

उस्मानाबाद : कसबे तडावळ्यात सध्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु आहे. पण या उपोषणावेळी एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. कसबे तडवळे येथील शेतकरी पुत्र असलेले गणेश निवृत्ती करंजकर हा रविवार (10 सप्टेंबर) रोजी उपोषणासाठी बसला होता. पंरतु आपल्याशिवाय आपली गाय धार काढू देत नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने थेट गाईलाच आंदोलनस्थळी आनलं आणि तिची धार काढली. सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक पुकारण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादमधील (Osmanabad) तडावळेमध्ये देखील आंदोलक करण्यात येत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात गावागावात पोहोचली आहे. जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता कसबे तडवळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर  छत्रपती शाहू महाराज चौकात उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  उपसरपंच प्रताप उर्फ बंडू करंजकर आणि गणेश निवृत्ती करंजकर हे दोघेजण सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणास बसलेत. 

आंदोलनासाठी बसलेल्या दोन करंजकर बंधू पैकी गणेश करंजकर यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे शेतात एक जर्सी गाय देखील आहे. सकाळी आंदोलनाला बसत असताना आपली गाय आपल्या शिवाय कोणालाही धार काढू देत नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. पंरतु सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर मात्र त्यांची खूप पंचायत झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोन तरुणांनी शेतात जाऊन गाईला उपोषण स्थळी आणले. तिथेची तिची धार काढण्यात आली. तर हे आंदोलन संपेपर्यंत ही गाय आंदोलन स्थळीच बांधण्यात येईल, असं करंजकर यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. 

आमरण उपोषणातून उठता येणार नसल्यानं तिला आंदोलनस्थळीचं चारा पाणी करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तर माझ्यासाठी मराठा आरक्षण हे जास्त महत्त्वाचं असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टी आमच्या पिढीला मिळाल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी हे आरक्षण महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. 

हेही वाचा : 

Manoj Jarange : यापुढे रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन करू नका; मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणाABP Majha Headlines : 06 PM: 28 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 28 September 2024 : ABP MajhaKedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
Embed widget