Opration Sindhoor: मी स्वत: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन बघून आलोय; नरेंद्र मोदींच्या जुन्या व्हिडीओची जोरदार चर्चा
Opration Sindhoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Opration Sindhoor: पाकिस्तानवर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत (Opration Sindhoor) स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला धमक्या द्यायला सुरूवात केलीय.भारताने सांडलेल्या रक्ताचा बदला घेऊ असा दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. तर भारताच्या 80 लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला असाही दावा शाहबाद शरीफ यांनी केला आहे. रात्रीच्या अंधारात शत्रू आला आणि आमच्यावर हल्ला करून निरपराधांना मारून गेला असंही शाहबाज शरीफ यांनी म्हटलंय.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा सुरु आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये असलेल्या अणुबॉम्बविषयी बोलताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर पाकिस्तान अणुबॉम्ब टाकेल अशी पोकळ धमकी देत असतो. याच अनुषगांने या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला. यावर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला टोला लगावत भाष्य केलं.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
तुम्हाला एक नवीन सल्ला दिला जातो की, पाकिस्तानपासून जरा घाबरुन राहा, कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. यावर नरेंद्र मोदी म्हणतात की, असं आहे की ती ताकद मी स्वत: लाहोरमध्ये जाऊन बघून आलोय. माझ्याकडे कोणताही व्हिसा नसताना, कोणतीही सुरक्षा यंत्रणा न घेता मी पाकिस्तानात गेलो होतो. यावेळी तिकडचा एक पत्रकार म्हणत होता, अरे बापरे...हे व्हिसा नसताना पाकिस्तानात कसे काय आले?...यावर एकेकाळी हा माझा देश होता, असं नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हणजे साधारण 2014 साली नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानला भेट दिली होती. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली होती.
View this post on Instagram
आज केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक-
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि किरण रिजिजू उपस्थित राहतील...तसंच महाराष्ट्रातून अनेक नेते या बैठकीत सहभागी होतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील प्रतिनिधी बैठकीला हजर राहणार आहेत.



















