एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

10 December In History: अल्फ्रेड नोबेल याचं निधन अन् पहिला नोबेल पुरस्कार; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं

आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

On This Day In History :आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजेच 10 डिसेंबर जगभरात मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राने 1950 पासून हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषीत केलाय. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यादींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाहीत असं संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. आजच्या दिवशी 1896 मध्ये अल्फ्रेड नोबेल याचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 10 डिसेंबर 1901 पासून नोबेल पुरस्कार दिला जाऊ लागला.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

अल्फ्रेड नोबेल याचं निधन अन् पहिला नोबेल पुरस्कार - (Alfred Nobel) 

आजच्या दिवशी 1996 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचं निधन झालं होतं. अल्फ्रेड नोबल यांनी डायनामायटचा शोध लावला होता. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो.  या पुरस्कारासाठी  जगभरातील शास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्र तज्ज्ञ यांची निवड केली जाते.  नोबेल पारितोषिक (nobel prize) हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.  अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिला नोबेल शांती पुरस्कार 10 डिसेंबर 1901 मध्ये देण्यात आला होता.

अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार -

आजच्याच दिवशी 1998 मध्ये भारताचे  प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.  कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत, तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

मानवाधिकार दिवस (Human Rights Day)

दहा डिसेंबर जगभरात मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 1950 सालापासून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असं संयुक्त राष्ट्रसंघटनेनं स्पष्ट केलं होतं. या दिवसासाठी 10 डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे 1948 साली याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक घोषणा पत्र जाहीर केलं होतं. हे घोषणा पत्र जगभरातल्या 500 पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत आहे. मानवाधिकार हा जगभरातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यादींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाहीत असं संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. जगातला प्रत्येक मनुष्य स्वतंत्रता, समानता आणि सन्मानाचा हक्कदार आहे, असं मानवाधिकांरांच्या घोषणा पत्रात सांगितलं आहे.

पहिल्यांदाच ट्रॅफिक सिग्नलचा वापर -


आजच्याच दिवशी 1868 मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले. लंडनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते.  रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत होता. कालंतराने यामध्ये अनेक बदल होत गेले. सध्या जगभरात याचा वापर करण्यात येतो.

अशोक कुमार यांचं निधन -

अशोक कुमार यांची आज 21 वी पुण्यतिथी. 10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईत निधन झाले होते. त्यांना बॉलिवूडचा पहिला अँटी हिरो म्हणूनही ओळखले जाते. 13 ऑक्टोबर 1911 ला भागलपुर येथील एका बंगाली कुटुंबात कुमुदकुमार गांगुली उर्फ अशोक कुमार यांचा जन्म झाला होता. अशोक कुमार यांनी 1943 मध्ये आलेल्या ग्यान मुखर्जी दिग्दर्शित किस्मत चित्रपटात प्रथमच अँटी हीरोची भूमिका साकारली होती. अशोक कुमार यांनी या चित्रपटात एका पॉकेटमारची भूमिका केली होती. 40 च्या दशकात चित्रपटात आलेल्या अशोक कुमार यांनी जवळ-जवळ 50 वर्षे म्हणजे 90 च्या दशकापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपट निर्मितीही केली आणि जिद्दीमधून देव आनंद यांनाही रुपेही पडद्यावर संधी दिली होती. मधुबालाची कारकिर्दही त्यांनीच 1949 मध्ये महल चित्रपटातून सुरु करून दिली होती.

१० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –   
1902 - तस्मानियामध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता.
1903 - पियरे क्यूरी आणि मॅरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.
1963 - आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटनपासून स्वतंत्र घोषित केले.
1992 - भारताच्या गुजरातमध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.
1998 - प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.
2000 - पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तानमधून 10 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
2004 - आजच्याच दिवशी अनिल कुंबळेने कपिल देवचा विक्रम मोडला. तो कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.
2001 - अभिनेते अशोक कुमार यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. 
2014 - भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget