Nora Fatehi Jacqueline Fernandez : नोरा फतेहीच्या मानहानी खटल्यावर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात होणार सुनावणी
Nora Fatehi Defamation Case : अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Nora Fatehi Jacqueline Fernandez Defamation Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आहेत. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला असून आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार,"नोराने दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 25 मार्च 2023 रोजी याप्रकरणाची सुनावणी पटियाला हाऊस कोर्टात होणार आहे.
The Patiala House Court of Delhi lists the hearing on a defamation complaint filed by Bollywood actor Nora Fatehi for March 25, 2023. Nora recently filed a defamation suit against Jacqueline Fernandez and various media organisations in Delhi Court.
— ANI (@ANI) January 21, 2023
(File photo) pic.twitter.com/3YNGWBG775
जॅकलिन फर्नांडिस काय भूमिका घेणार?
नोराच्या (Nora fatehi) तक्रारीनंतर आता जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) काय भूमिका घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यापूर्वी जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील (Prashant Patil) यांनी नोराचा काहीतरी गैरसमज झाल्याचे स्पष्ट केले होते. तसेच नोराचे सर्व आरोप निराधार असल्याचंदेखील ते म्हणाले होते. तसेच जॅकलिनचे वकील असंही म्हणाले होते की, "गरज पडल्यास जॅकलीन कायदेशीररित्या नोरा फतेहीविरोधात मानहानीचा खटला दाखल करु शकते".
नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात वाद का आहे?
सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणाबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची अनेकदा चौकशी केली आहे. नोरा आणि जॅकलीनने अनेकदा न्यायालयात त्यांची बाजू मांडली आहे. जॅकलीनमुळे माझं नाव खराब झाल्याचा आरोप नोराने केला आहे. तसेच 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी माझं नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा दावा नोराने केला आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे नोरा आणि जॅकलिनमध्ये वाद सुरु झाला आहे.
मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर
सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर आहे. नोराने तिच्या याचिकेत जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
संबंधित बातम्या