मोठी बातमी! NEET परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार, NBA चा निर्णय
NEET PG Exam 2025 : 15 जून रोजी होणारी नीट परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानंतर आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET PG Exam 2025) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) हा निर्णय जाहीर केला आहे. या आधी नीट परीक्षा (NEET Exam 2025) ही 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश या आधी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
NEET PG Exam 2025 Postponed : NEET परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार
नीट परीक्षा दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आता ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचं नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच 15 जून रोजी घेण्यात येणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
National Board of Examinations in Medical Sciences to conduct NEET-PG 2025 in a single shift. NEET-PG 2025 scheduled to be held on 15.06.2025 has been postponed pic.twitter.com/pdzc4iQDOC
— ANI (@ANI) June 2, 2025
NEET Exam Date : परीक्षेत अधिक पारदर्शकता येणार
नीटच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबंधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असं नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने स्पष्ट केलं आहे.
NEET PG 2025 Admit Card : अॅडमिट कार्ड चार दिवस आधी
नवी तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या चार दिवस आधी अॅडमिट कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
ही बातमी वाचा:


















