Gadchiroli Naxal : भूपती अन् सतीश दोघेही गद्दार, माफ करणार नाही; माओवादी संघटनेकडून धमकीच पत्र, शरण आलेल्या नक्षलवाद्यांवर बडतर्फीची कारवाई
Gadchiroli Naxal : पोलीस आणि सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपालराव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपतीला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने माओवादी संघटनेतून बडतर्फ केले आहे.

Gadchiroli Naxal : पोलीस आणि सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपालराव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपतीला (Naxal Leader Bhupati) माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने माओवादी संघटनेतून बडतर्फ केले आहे. त्या संदर्भातला एक पत्रक केंद्रीय समितीच्या प्रवक्त्याने जारी केला आहे. भूपती नंतर दुसऱ्याच दिवशी छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Naxal) 200 माओवाद्यांसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या सतीशला सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एवढेच नाही तर भूपती आणि सतीश सोबत आत्मसमर्पण करणाऱ्या जवळपास 271 माओवाद्यांना सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
Gadchiroli Naxal : आम्हाला भूपती वर 2011 पासूनच शक होता
भूपती आणि सतीश दोघेही गद्दार आहेत. त्यांनी शत्रूशी म्हणजेच पोलिसांची हात मिळवणी केल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. आम्हाला भूपती वर 2011 पासूनच शक होता, त्याचे पोलिसांशी संबंध होते, असा आरोपही या पत्रकात करण्यात आलेला आहे. भूपती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र पोलिसांची आधीपासूनच संपर्कात होता आणि त्यामुळेच त्याने त्याची पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी आत्मसमर्पण करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले, असा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. पोलीस आणि सुरक्षा दला विरोधातला आमचा सशस्त्र संघर्ष सुरूच राहील, असेही केंद्रीय समितीने या पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
Naxal Surrender : माओवाद्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याशी गद्दारी, माफ केले जाणार नाही
आत्मसमर्पण करणारे भूपती आणि सतीश सारखे माओवादी नेते अवसरवादी आणि स्वार्थी होते. त्यांनी माओवाद्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याशी गद्दारी केली. दोघांनी त्यांच्या समर्थकांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि माओवाद्यांचे महत्त्वाचे शस्त्र सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल, असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. भूपती आणि सतीशला कोणत्याही स्थितीत माफ केले जाणार नाही. मात्र त्यांच्यासोबत आत्मसमर्पण करायला गेलेले इतर नक्षली जर भविष्यात माओवाद्यांच्या संघटनेत परत येऊ इच्छित असले, तर त्यांना आम्ही परत घेऊ, असंही या पत्रकात सांगण्यात आले आहे.
1980 पासून 2025 पर्यंतमहाराष्ट्रातील माओवादाची आकडेवारी
दरम्यान, 1980 पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहे.
आजवर 4213 माओवादी यांना अटक करण्यात आली आहे.
तर 1522 माओवादी पोलिसांना शरण आले आहे.
तर 347 माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे.
आणखी वाचा
























