एक्स्प्लोर

Yashashree Shinde Case: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत मोठी अपडेट, पोलिसांना सापडण्याआधीच दाऊद शेखने महत्त्वाचा पुरावा नष्ट केला?

Yashashree Shinde & Dawood Shaikh: उरण हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट, आदल्या दिवशीच यशश्री शिंदे जुईनगरला दाऊद शेखला भेटली, यशश्रीच्या त्या आक्षेपार्ह फोटोंबाबत नवा खुलासा. दाऊदने फेकल्यानंतर यशश्रीचा फोन कुठे गेला?

नवी मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती. तेव्हापासून पोलीस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दाऊद शेखला (Dawood Shaikh) अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशश्रीचा (Yashashree Shinde) मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेखने हे दोन्ही फोन फॉरमॅट केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे. 

पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेखला यशश्री शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते.  दाऊदने यशश्रीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र, या तपासात दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती. दाऊदकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. हे फोटो दाखवून तो यशश्रीला ब्लॅकमेल करत होता, असे सांगितले जाते. या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवले होते, अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते. त्यामुळे या तपासात दाऊद आणि यशश्री शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलीस तपासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरु शकला असता.

मात्र, यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. तर यशश्रीचा मोबाईल त्याने हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर टाकून दिला होता. तो मोबाइलही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, यशश्रीचा मोबाइलही दाऊदने फॉरमॅट केला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस तज्ज्ञांची मदत घेऊन दाऊदच्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळवू शकतात का, हेदेखील बघावे लागेल. तर यशश्री शिंदे हिचा मोबाईल दाऊदने सांगितल्यापासून हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असेल तो गेला कुठे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 

उरण हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट, आदल्या दिवशीच यशश्री शिंदे जुईनगरला दाऊद शेखला भेटली

दाऊदच्या पोलीस चौकशीदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिची हत्या होण्याच्या आदल्या दिवशीच ती दाऊद शेखला भेटली होती. नवी मुंबईतील जुईनगर येथे यशश्री आणि दाऊदची (Dawood Shaikh) भेट झाली होती. दाऊद पॉक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा यशश्रीच्या मागे लागला होता. त्याच्याविरोधात खटला सुरुच होता. पण तो मोजक्याच सुनावणीवेळी हजर असायचा. त्यामुळेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे यशश्रीने जुईनगरला दाऊदला भेटल्यानंतर पोलिसांकडे वेळीच तक्रार केली असती तर तो पुन्हा तुरुंगात गेला असता. 

आणखी वाचा

यशश्रीने टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला की दाऊदच्या जबरदस्तीने?; आता टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 10 October 2024Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेवरुन महाडिकांंचं आक्षेपार्ह विधान, धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखलMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 11 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
Embed widget