एक्स्प्लोर

यशश्रीने टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला की दाऊदच्या जबरदस्तीने?; आता टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर

आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर पोक्सोअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता

मुंबई  : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या उरण यशश्री हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून (Police) तपास सुरू आहे. या तपासातून दररोज नवनवी माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याचाही शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. उरणमधील पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानुसार, यशश्री हत्याकांड प्रकरणाती प्रमुख आरोपी दाऊद शेख यास पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली, अनेक पथके नेमण्यात आली होती. या तपासातून 29 जुलै रोजी आरोपीला बंगळुरुतून (Banglore) अटक करण्यात आली असून आज त्यास न्यायालयात (court) हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी, न्यायालयाने आरोपी दाऊदला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीच्या अंगावर गोंदण्यात आलेल्या दोन टॅटूंवरुन (Tatoo) लव्ह ट्रायअँगलचा शोध घेतला जात आहे. आता, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे.   

दाऊद आणि यशश्री हे 10 वी पर्यंत एकत्र शाळेत शिकले आहेत. दरम्यान, आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर पोक्सोअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये, त्यास अटकही झाली होती. मात्र, सुटकेनंतर तो पुन्हा जबरदस्तीने यशश्रीच्या मागे लागला होता. तो तिचा पाठलाग करत होता, तिने त्याच्यासोबत लग्न करुन बँगळुरूला यावे, असे त्याला वाटायचे. मात्र, मृत मुलीने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यातूनच, आरोपीने मुलीचा निर्घून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅटू आर्टीस्ट रडारवर

मुलीने दाऊदच्या नावाने टॅटू केला होता, ते त्याच्यातच रेकॉर्डवर आलेलं आहे. यशश्रीच्या अंगावर दोन टॅटू होते, मग दोन्ही टॅटू दाऊद शेखच्या नावाचे होते की दुसरा टॅटू दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा होता, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला होता. त्यावर, लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याबाबत सध्या सांगता येणार नाही. पण, टॅटूचा विषय आहे तो रेकॉर्डवर आहे, एक टॅटू दाऊदच्या नावाचा होता असे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी याप्रकरणी दाऊदचा मित्र मोहसीन यासही अटक केली आहे. मात्र, याप्रकरणात मोहसीनचा ट्रायअँगल आहे की नाही हे अद्याप तरी समोर आलं नाही. पण, दोघांमध्ये जेव्हा वाद व्हायचा, ते एकमेकांना फोनवर ब्लॉक करायचे. तेव्हा मोहसीनच्या माध्यमातून त्यांचा संवाद होत असायचा अशीही माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली. 

दरम्यान, यशश्रीच्या पोस्टमार्टममध्ये तिच्या अंगावर दोन टॅटू गोंदण्यात आल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समक्ष यशश्रीच्या अंगावर हा टॅटू गोंदण्यात आला होता. त्यामुळे, यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदायला भाग पाडले होते, शिवाय दुसरा टॅटू कोणाचा हेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. हा टॅटू कोठे काढला, कोणी काढला आणि याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. त्यावरुन, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे.

आरोपी बस ड्रायव्हर आहे

दरम्यान, ओरापी दाऊद हा व्यवसायाने ड्रायव्हर होता, सध्या एका कंपनीत बस ड्रायव्हर म्हणून तो काम करत होता. त्याचं लग्नही झालेलं नाही. या प्रकरणात लव्ह ट्रायअँगल अद्याप पुढे आलेला नाही. पण, लग्नासाठी मुलीच्या मागे लागला होता, कर्नाटकला तिला नेण्यासाठी प्रयत्न करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
Embed widget