एक्स्प्लोर

Jyotiraditya Shinde : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प: ज्योतिरादित्य शिंदे

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा 1 आणि 2 चे व्यावसायिक कार्यान्वयन 31 मार्च 2025 पर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. 

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही, तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानास्पद  प्रकल्प आहे, असे वक्तव्य केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी केले.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी ते आज नवी मुंबईत आले होते.  यावेळी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती पत्रकारांना दिली.

अठरा हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या संपर्क सुविधेला फार मोठा फायदा होईल, आणि हा प्रकल्प 5 टप्प्यात राबविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.  या प्रकल्पाची भौतिक आणि  आर्थिक प्रगती 55-60 टक्के पर्यंत पूर्ण झाली आहे, असेही ते म्हणाले.  या प्रकल्पाची सुरुवात 2018 मध्ये झाली असून 31 मार्च 2025 पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे एक धावपट्टी, एक टर्मिनल आणि दोन कोटी प्रवासी क्षमता निर्माण केली जाईल.  प्रकल्पाच्या 3, 4 आणि 5 टप्प्यात नऊ कोटी पर्यंतच्या वाढीव प्रवासी क्षमतेसह दुसरी धावपट्टी आणि चार टर्मिनल तयार केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रो संपर्क सुविधेद्वारे जोडले जाईल तसेच भविष्यात  विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे सिंधिया यांनी गती शक्ती योजनेंतर्गत मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत सांगितले.

विमानतळ तीन दिशांनी रस्त्यांना जोडलेले असेल. ते रस्ते म्हणजे - राष्ट्रीय महामार्ग 4B (348), सायन पनवेल महामार्ग आणि अटल सेतू.  तारघर रेल्वे स्थानकाद्वारे विमानतळ रेल्वेला जोडले जाईल.  विमानतळासाठी मेट्रो संपर्क सुविधा उपलब्ध असेल - मेट्रो लाईन 2D: डीएन नगर ते मंडाला-मानखुर्द, मेट्रो लाईन 8: मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई पेंधर- बेलापूर- तळोजा मेट्रो लाईन. भविष्यात कुलाबा येथून हॉवर क्राफ्टद्वारे आणि फेज 2 मध्ये रायगड येथून कार्गोद्वारे विमानतळ जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

याशिवाय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले असे विमानतळ असेल ज्याच्या 1600 हेक्टर क्षेत्रात शहराच्या बाजूने आणि हवाई क्षेत्रात दहा किलोमीटर अंतरावर स्वयंचलित प्रवासी वाहतूक होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात शंभर टक्के हरित विमानतळ तयार होत आहे. या  विमानतळामुळे देशातील हवाई वाहतूक वाढेल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. देशातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक 2030 पर्यंत 15 कोटींवरून 30 कोटींपर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील सहा वर्षांत देशात 200 हून अधिक विमानतळ निर्माण करण्याचा सरकारचा संकल्पही असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याप्रसंगी ठरलेल्या वेळेत प्रकल्प  पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल राज्य सरकार आणि सिडकोचे आभार मानले.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Embed widget